Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिखर थिरकणार संगीताच्या तालावर

By admin | Updated: May 22, 2015 23:14 IST

हरभजन सिंग, युवराज सिंग, श्रीसंत, विराट कोहली यांच्या पाठोपाठ आता शिखर धवनही संगीताच्या तालावर थिरकताना दिसेल.

भारतीय क्रिकेटपटू खेळाबरोबरच अभिनय, नृत्य अशा कला सांभाळतानाही दिसले आहेत. हरभजन सिंग, युवराज सिंग, श्रीसंत, विराट कोहली यांच्या पाठोपाठ आता शिखर धवनही संगीताच्या तालावर थिरकताना दिसेल. शिखर व त्याची पत्नी आयेशा एका डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये ‘वाईल्ड कार्ड एन्ट्री’ घेणार असल्याची कुजबूज आहे. याआधीही त्याने कपिल शर्माच्या शोमध्ये चाहत्याच्या मागणीनुसार नृत्याची चुणूक दाखवली होती.