Join us

शेखरची नवी इनिंग

By admin | Updated: May 20, 2015 00:12 IST

उत्तम संगीत आणि गायनाने लाखो लोकांना भुरळ पाडणाऱ्या विशाल-शेखरची जोडी सर्वांनाच माहीत आहे. विशाल ददलानी याआधीही आॅनस्क्रीन दिसला आहे.

उत्तम संगीत आणि गायनाने लाखो लोकांना भुरळ पाडणाऱ्या विशाल-शेखरची जोडी सर्वांनाच माहीत आहे. विशाल ददलानी याआधीही आॅनस्क्रीन दिसला आहे. विशालकडून प्रेरणा घेऊनच की काय, शेखर रावजीयानीही आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. सोनम कपूरच्या आगामी ‘निरजा’ चित्रपटात तो तिच्या प्रियकराच्या भूमिकेत दिसणार आहे. सुरेल आवाजाच्या आणि हॅण्डसम दिसणाऱ्या शेखरची ही नवी इनिंग कशी असेल, याकडेच त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.