Join us  

सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत ढसाढसा रडली शहनाज गिल, व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 3:05 PM

अलीकडे Shehnaaz Gill इव्हेंटच्या निमित्ताने कॅमे-यासमोर आली आणि तिला अश्रू आवरता आले नाहीत. तिचा हा अनसीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

सर्वांचा लाडका सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) अकाली गेला. सिद्धार्थच्या निधनाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला पण अद्यापही चाहते सावरलेले नाहीत.  त्याची मैत्रीण शहनाज गिल (Shehnaaz Gill ) हिची अवस्था तर बघवत नाही. होय, काही दिवसांपूर्वी ती कामावर परतली असली तरी सिद्धार्थच्या मृत्यूच्या धक्क्यातून ती सावरलेली नाही. अलीकडे शहनाज इव्हेंटच्या निमित्ताने कॅमे-यासमोर आली आणि तिला अश्रू आवरता आले नाहीत. सिद्धार्थच्या आठवणीत ती ढसाढसा रडली. तिचा हा अनसीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडे शहनाजचा ‘हौंसला रख’ या पंजाबी डेब्यू सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी शहनाज सिद्धार्थच्या आठवणीने इतकी व्याकूळ झाली की, तिला अश्रू अनावर झालेत.

या व्हिडिओत शहनाज  सिद्धार्थची आठवण काढून अक्षरश: ढसाढसा   रडताना दिसत आहे. तर दिलजीत दोसांज  तिला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तरीही शहनाज ला रडू आवरत नाहीये. हा व्हिडिओ पाहून सिद्धार्थ आणि शहनाजचे चाहते  भावुक झाले आहेत.व्हिडीओवर  चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तिला सावरण्याचा सल्ला चाहते देत आहेत. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळीही शहनाजची अवस्था पाहून  प्रत्येकाला अश्रू अनावर झाले होते.  शहनाज सारखी रडत होती. तिला कसलीही शुद्ध नव्हती. पोलीस बंदोबस्तात शहनाज स्मशानभूमीत दाखल झाली होती. पण तिच्या डोळ्यांतून अखंड अश्रूधारा वाहत होत्या.बिग बॉस १३ मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर या जोडीला ‘सिडनाज’ या नावाने चाहते ओळखू लागले होते. सिद्धार्थ आणि शहनाज यांच्या मैत्रीची सतत सोशल मीडियावर चर्चा होत असे. सिद्धार्थ व शहनाज लवकरच लग्न करणार होते, अशीही चर्चा होती.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाशेहनाझ गिल