Join us  

"तुला प्रेम समजलंच नाही" शहनाज गिलचा गुरु रंधावासोबत रोमान्स; चाहते नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 8:53 AM

शहनाज गिलने सोशल मीडियावर गुरु रंधावासोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला.

अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) तिच्या क्युट लूकमुळे आणि हटके स्टाईलमुळे लोकप्रिय आहे. 'बिग बॉस' मधून शहनाज गिल हे नाव घराघरात पोहोचलं. बिग बॉसच्या घरात सिद्धार्थ शुक्लासोबत शहनाजच्या अफेअरची चर्चा होती. चाहत्यांनी त्यांना 'सिडनाज' असं नावही दिलं होतं. २ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. आता शहनाज त्यातून सावरली असून मूव्ह ऑन करत आहे. नुकताच तिचा आणि गायक गुरु रंधावाचा (Guru Randhawa) एक रोमँटिक व्हिडिओ व्हायरल होत आहे. म्युझिक अल्बमसाठी त्यांनी हा व्हिडिओ शूट केला आहे. मात्र हे पाहून सिडनाजचे चाहते काहीसे नाराज झालेत.

शहनाज गिलने सोशल मीडियावर गुरु रंधावासोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला. यात शहनाज त्याच्या पाठीवर उडी मारते. गुरु शहनाजला आपल्या पाठीवर उचलून घेतो आणि दोघंही हसतात. व्हिडिओला कॅप्शनमध्ये तिने लिहिले,'रंग तेरे चेहरे दा, दुनिया तो वखरा ए, सनराइज और अल्बम जी थिंग को इतना प्यार देने के लिए धन्यवाद.' सर्वांना शहनाजचं हे नवीन गाणं आवडलं असणार अशी तिने आशा व्यक्त केली आहे.

व्हिडिओमध्ये शहनाजने ब्लॅक रंगाची हुडी घातली आहे. तसंच मॅचिंग शॉर्ट्समध्ये ती क्युट दिसत आहे. तिचा लूक अगदीच नॅचरल आहे. तर गुरु रंधावाने ग्रे रंगाची हुडी आणि काळी पँट घातली आहे. मॅचिंग क्रॉक्समध्ये तो हँडसम दिसत आहे. या अल्बम व्हिडिओत दोघंही खूप खूश दिसत आहेत.

शहनाजच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी निगेटिव्ह कमेंट केल्या आहेत.'तुला खरं प्रेम समजलंच नाही. मी आता तुझा आदर करत नाही','यांना सोबत बघून मला दु:ख होतंय','कोणकोणासोबत मूव्ह ऑन करशील' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :शेहनाझ गिलसोशल मीडियाट्रोलबिग बॉससिद्धार्थ शुक्ला