Join us

‘ती’ साडी होती बॉयफ्रेंड आनंद अहुजाची चॉईस!

By admin | Updated: May 27, 2017 01:53 IST

आत्तापासून बॉयफ्रेंड आनंद अहुजा सोनम कपूरची बरीच काळजी घेताना दिसतोय. सोनमने अलीकडे कान्स फिल्म्स फेस्टिव्हल २०१७ मध्ये हजेरी लावली.

आत्तापासून बॉयफ्रेंड आनंद अहुजा सोनम कपूरची बरीच काळजी घेताना दिसतोय. सोनमने अलीकडे कान्स फिल्म्स फेस्टिव्हल २०१७ मध्ये हजेरी लावली. यातील सोनमचे आऊटफिट निवडण्यात आनंदचा मोठा हात होता. सोनम कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड आनंद अहुजा यांची प्रेमकहाणी आता बरीच पुढे गेली आहे. बिनधास्त सोनम अलीकडे सर्रास आनंदसोबत दिसू लागली आहे. खरे तर आनंद अहुजा हा एक परफेक्ट बॉयफ्रेंड आहे. होय, अगदी प्रत्येक मुलीला हवा असतो तसा. आत्तापासूनच आनंद सोनमची बरीच काळजी घेताना दिसतोय. सोनमने अलीकडे कान्स फिल्म्स फेस्टिव्हल २०१७ मध्ये हजेरी लावली. कान्समध्ये सोनमने नेसलेली व्हाईट साडी आठवते? ती आनंद अहुजाची चॉईस होती. यासाठी आनंदनेच सोनम व तिची बहीण रियाला डिझाइनर्स सुचवले होते. आनंदचा स्वत:चा गारमेंट्स बिझनेस आहे. त्यामुळे या डिझाइनर्सला तो चांगल्याप्रकारे ओळखत होता. मग काय, आनंदने त्या डिझाईनर्सची शिफारस केली. सोनम याचमुळे कान्समध्ये सिम्मा साडीत दिसली. भारतीय डिझाइनर्सला प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश होता. आता या साडीत सोनम किती सेक्सी अन् ग्लॅमरस दिसली, हे तुम्ही पाहिलेच. एकंदर काय, तर सोनमसारखीच आनंदची फॅशन टेस्टही जबरदस्त म्हणायला हवी.