Join us

शशी कपूर ठणठणीत

By admin | Updated: March 23, 2016 17:57 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांनी चारच दिवसांपूर्वी ७८ व्या वर्षात पदार्पण केले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांनी चारच दिवसांपूर्वी  ७८ व्या वर्षात पदार्पण केले. त्यांनी मुंबईतील त्यांच्या आवडत्या ठिकाणी पृथ्वी थिएटरमध्ये चाहत्यांसोबत मोठया उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला. 
 
शशी कपूर यांची प्रकृती उत्तम आहे पण सकाळपासून इंटरनेटवर शशी कपूर यांची निधनाची अफवा पसरली आहे. बुधवार सकाळपासून व्हॉटस अॅपवर शशी कपूर यांचे निधन झाल्याचे मॅसेज फिरत आहेत. ही अफवा सोशल नेटवर्किंग साईट टि्वटर, फेसबुकवर इतक्या वेगाने पसरली कि, ‘RIP Shashi Kapoor’ असे मॅसजेसेच्या पोस्ट सुरु झाल्या. 
 
अखेर कपूर कुटुंबातील ऋषी कपूर यांनी यावर खुलासा केला. या अफवांमध्ये काहीही तथ्य नसून, शशी कपूर यांची प्रकृती उत्तम आहे ते ठणठणीत आहेत असे ऋषी यांनी सांगितले.