Join us
Daily Top 2Weekly Top 5

शशांक केतकर - तेजश्री प्रधान घटस्फोट घेणार ?

By admin | Updated: April 29, 2015 12:22 IST

होणार सून मी या घरची या मालिकेतील लोकप्रिय श्री आणि जान्हवीची जोडी आता मालिकेप्रमाणेच ख-या आयुष्यातही घटस्फोटाच्या वाटेवर पोहोचले आहेत.

ऑनलाइन लोकमत 
पुणे, दि. २९ - होणार सून मी या घरची या मालिकेतील लोकप्रिय श्री आणि जान्हवीची जोडी आता मालिकेप्रमाणेच ख-या आयुष्यातही घटस्फोटाच्या वाटेवर पोहोचले आहेत. अभिनेता शशांक केतकरने पत्नी तेजश्री प्रधान - केतकरपासून घटस्फोट मिळावा यासाठी पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला आहे. 
होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या श्री आणि जान्हवी या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान या दोघांनी रिल लाईफ प्रमाणेच ख-या आयुष्यातही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ८ फेब्रुवारी २०१४ मध्ये शशांक - जान्हवीने पुण्यात लग्नही केले होते. मात्र अवघ्या वर्षभरातच या दोघांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला आहे. शशांक केतकरने पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे एका वृत्तपत्रात म्हटले आहे. या अर्जात शशांकने खासगी व व्यावसायिक आयुष्यातील काही प्रसंग मांडल्याचे समजते. 
शशांक केतकर व तेजश्री प्रधान ही रिअल लाईफ जोडी ही सर्वात लोकप्रिय जोडी म्हणून प्रसिद्ध होती. या दोघांचे लग्नही खूप गाजले होते. पण आता अवघ्या वर्षभरात या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. होणार सून मालिकेत घटस्फोटापर्यंत पोहोचलेले श्री व  जान्हवीत पुन्हा प्रेम बहरत असल्याचे दाखवले जात आहे. रिल लाईफप्रमाणे त्यांच्या ख-या आयुष्यातही हे संबंध टिकून राहावे असे चाहत्यांना वाटते.