Join us  

Vikram Gokhale : 'स्टार झालास का रे?' विक्रम गोखलेंनी जेव्हा शशांक केतकरचे कान पिळले, शशांकची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 10:01 AM

कालाय तस्मै नम: मालिकेत अभिनेता शशांक केतकरने विक्रम गोखले यांच्या नातवाची भुमिका साकारली होती. विक्रम काकांच्या आठवणीत शशांकही भावुक झाला आहे.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. कोणासाठी विक्रम सर तर कोणासाठी विक्रम काका हे आदर्शच होते. त्यांची उणीव प्रत्येकालाच भासत आहे. कालाय तस्मै नम: मालिकेत अभिनेता शशांक केतकरनेविक्रम गोखले यांच्या नातवाची भुमिका साकारली होती. विक्रम काकांच्या आठवणीत शशांकही भावुक झाला आहे.

शशांकने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्याने लिहिले आहे, 'अभिनय क्षेत्रात यायच्या आधी ऑस्ट्रेलियाला ज्यांच्या समोर पहिल्यांदा नाटकाचा प्रयोग सादर केला ते विक्रम काका.अभिनय क्षेत्रात आल्यावर ज्यांच्या बरोबर त्यांचा नातू म्हणून 'कालाय तस्मै नमः' या मालिकेत पहिल्यांदा काम केलं ते विक्रम काका.'गोष्ट तशी गमतीची'च्या एका प्रयोगाला मी फक्त १५ मिनिटे राहिलेली असताना थिएटरवर पोहोचलो, काका नाटक बघायला ४० मिनिट आधी येऊन बसले होते. फक्त 15 मिनिट आधी आलास? स्टार झालास का रे? असं म्हणून कान पिळणारे विक्रम काका.त्यांनी लिहिलेल्या 'colour called gray' या ,सिनेमाच्या team मध्ये तू हवास असं म्हणणारे विक्रम काका.२०१० ते २०२२ आणि त्या ही आधी... आवाज, डोळे, देहबोली, भाषा याचा वापर ज्यांच्या कडून शिकण्याचा प्रयत्न केला ते विक्रम काका.प्रत्येक माणसाला त्याच्या कामा पलीकडेही ठाम मतं हवीत हे मनावर बिंबवणारे विक्रम काका.तुम्ही कायम होताच आणि असालच.'

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या सिनोमात विक्रम गोखले यांचीही भुमिका होती.तसेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत ते काम करत होते. मात्र तब्येत खालावल्याने त्यांने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले मात्र अखेर काल विक्रम गोखले यांची प्राणज्योत मालावली. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतुन त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

टॅग्स :शशांक केतकरविक्रम गोखलेमृत्यूइन्स्टाग्राममराठी अभिनेता