Join us
Daily Top 2Weekly Top 5

"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:58 IST

"तिने कायम माझी साथ दिली...", शशांकने कोणाचं नाव घेतलं?

अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar)  'होणार सून मी या घरची' मालिकेमुळे घराघरात पोहोचला. यानंतर त्याने अनेक मालिका केल्या. त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला. सध्या शशांक 'मुरांबा' मालिकेत दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीची आहे. दरम्यान शशांक इंडस्ट्रीतील अनेक मुद्द्यांवर तसंच सामाजिक विषयांवरही बेधडकपणे भाष्य करत असतो. नुकतंच त्याने इंडस्ट्रीतील मित्र कोण यावर उत्तर दिलं.

काल मैत्री दिनानिमित्त अभिनेता शशांक केतकरने एका मुलाखतीत त्याच्या इंडस्ट्रीतील मित्रांची नावं घेतली. त्याने दिलेलं उत्तर ऐकून अनेकांना आश्चर्यच वाटलं. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत शशांक म्हणाला,"अतिशय प्रामाणिकपणे सांगायचं तर इंडस्ट्रीत माझे फार मित्र नाहीत. म्हणजे तसे म्हणायला मित्र आहेत पण ज्यांनी अगदी साथ दिली अशांची नावं घ्यायची तर अनुजा साठे आहे. ती माझी अगदी घट्ट मैत्रीण आहे. काहीही झालं तरी ती माझ्यासाठी कायम उभी राहील याची मला खात्री आहे. तिचाच नवरा सौरभ आहे. ओंकार कुलकर्णी म्हणून एक माझा चांगला मित्र आहे"

तो पुढे म्हणाला, "तसंच आमच्या मालिकेत होता तो म्हणजे सुमित भोकसे. तो फोटोग्राफर आहे आणि आमच्याकडे कामही करतो. लॉकडाऊनमध्ये शूट करत होतो तेव्हा आम्ही एकाच खोलीत राहायचो. आम्ही कॅरम खेळायचो. त्याच्यासाठी मी बऱ्याच गोष्टींमध्ये मार्गदर्शक आहे. असे अनेक मित्र आहेत नाही असं नाही. पण बायको ही माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. तिच्यासोबत मी वाटेल ते शेअर करु शकतो."

टॅग्स :शशांक केतकरअनुजा साठेमराठी अभिनेताफ्रेंडशिप डे