Join us  

'शैतान' ओटीटीसाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 1:20 PM

'शैतान' आता ओटीटीवर हा बघायला चाहते खूपच उत्सुक आहेत.

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R. Madhvan) स्टारर 'शैतान' (Shaitan Movie) सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला. शैतानची गोष्ट प्रेक्षकांना बरीच भावली. आता हा हॉरर थ्रिलर चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'शैतान'ची ओटीटी रिलीज डेटही समोर आली असून सिनेमा तुम्हाला घरबसल्या पाहता येणार आहे. 

अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी OTT प्लॅटफॉर्मवर येतात. त्यामुळे 'शैतान' सिनेमा मे महिन्यात ओटीटीवर रिलीज होऊ शकतो.  या सिनेमाचे अधिकार नेटफ्लिक्सने विकत घेतले असून 3 मे रोजी शैतान ओटीटीवर रिलीज होणार आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये. 'शैतान' आता ओटीटीवर हा बघायला चाहते खूपच उत्सुक आहेत.

'दृश्यम २' च्या सुपर यशानंतर अजय देवगणने पुन्हा एकदा 'शैतान'मध्ये फॅमिली मॅनच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे, तर आर माधवनने भयंकर खलनायकाच्या भूमिकेत प्रसिद्धी मिळवली आहे. ‘शैतान’चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. याआधी बहलने 'क्वीन' आणि 'सुपर ३०' सारखे चित्रपटही दिग्दर्शित केले होते. 'शैतान'च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर अजय देवगण आणि आर माधवन व्यतिरिक्त या चित्रपटात ज्योतिका, जानकी बोडीवाला आणि अंगद राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

टॅग्स :अजय देवगणसेलिब्रिटीबॉलिवूडआर.माधवन