Join us

ये तू इसके साथ मत घूम रे...! अजय देवगणसोबत जाहिरात करणे शाहरूखला पडले महाग!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 16:13 IST

जाहिरात प्रदर्शित झाली आणि लगेचच शाहरूख नेटक-यांच्या निशाण्यावर आला. यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.

ठळक मुद्देशाहरूख सुमारे तीन वर्षांपासून मोठ्या स्क्रिनवर दिसलेला नाही. आता तीन वर्षांनंतर तो ‘पठान’ या सिनेमात दिसणार आहे.

दीर्घकाळापासून बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान मोठ्या पडद्यावरून गायब आहे. छोट्या पडद्यावर मात्र त्याची जबरदस्त चर्चा होतेय. केवळ चर्चा नाही तर यामुळे तो ट्रोलही होतोय. कारण काय तर एक जाहिरात. होय, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका जाहिरातीमुळे शाहरूख ट्रोलिंगचा शिकार होतोय. जाहिरात कशाची तर एका कंपनीच्या पानमसाल्याची.नुकतीच ही जाहिरात प्रदर्शित झाली. यात अजय देवगन एका अनोळखी व्यक्तीचा पाठलाग करताना दिसतो. परदेशात ‘विमल’मुळे त्यांची शाहरूखशी भेट होते. ही जाहिरात प्रदर्शित झाली आणि लगेचच  शाहरूख नेटक-यांच्या निशाण्यावर आला. यावरचे अनेक मीम्सही व्हायरल झालेत.

‘तुझी ब्रँड व्हॅल्यू इतकी घटली की, तुझ्यावर अशा जाहिराती करण्याची वेळ आलीये,’ अशा उपरोधिक शब्दांत एका युजरने शाहरूखला सुनावले. काहींनी यानिमित्ताने शाहरूख व अजयच्या जोडीचीही खिल्ली उडवली. अनेक डायरेक्टर्स, प्रोड्यूसर्स जे करू शकले नाहीत, ते काम विमलने करून दाखवले, अशा शब्दांत एका युजरने या जोडीची टिंगल केली.

 तुम्हाला ठाऊक आहेच की, शाहरूख सुमारे तीन वर्षांपासून मोठ्या स्क्रिनवर दिसलेला नाही. आता तीन वर्षांनंतर तो ‘पठान’ या सिनेमात दिसणार आहे. सध्या या सिनेमाचे शूटींग सुरु आहे.   या चित्रपटात शाहरूखसोबत दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम हे दोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानअजय देवगण