Join us
Daily Top 2Weekly Top 5

#Ask SRK: शाहरुखने सांगितलं मन्नत बंगल्यातील एका रूमचं भाडं; बघा, परवडतंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 11:37 IST

चाहत्यांचे प्रश्न, एसआरकेचे उत्तर...

ठळक मुद्दे‘मन्नत’ पाहिल्यावरच तो विकत घेण्याचा शाहरूखनं घेतला होता.

बॉलिवूडचा किंगखान दीर्घकाळापासून रूपेरी पडद्यावरून गायब आहे. पण  चाहत्यांपासून दूर नाही. बुधवारी शाहरूखनं चाहत्यांची इच्छा पूर्ण करत  #AskSRK द्वारे  चाहत्यांना प्रश्न विचारण्याची संधी दिली. यावेळी चाहत्यांनी शाहरूखला अनेक अतरंगी प्रश्न विचारले. एका चाहत्यानं शाहरुखला मन्नतमधील एका रुमचं भाडं विचारलं. त्यावर हजरजबाबी शाहरुखनं जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हाला धक्का बसू शकतो.होय, ‘तूफान का देवता’ नावाच्या ट्विटर हँडलवरून एका चाहत्यानं शाहरूखला प्रश्न विचारला. ‘सर, मन्नतमध्ये एक रूम भाड्यानं हवी. किती भाडं पडेल?’ असा त्याचा सवाल होता.

यावर हजरजबाबी शाहरूखनं दिलेल्या उत्तराने सर्वांची मनं जिंकली.  त्यानं लिहिलं, ‘30 वर्षांची मेहनत लागेल’.शाहरूखच्या या उत्तरानं सगळेच प्रभावित झाले. त्याच्या या ट्वीटला क्षणात हजारो लाईक्स मिळालेत.

एका ट्वीटर युजरने शाहरुखला त्याच्या फ्लॉप सिनेमांवरून टोमणा मारला. सर्व सिनेमे फ्लॉप होत आहेत, कसं वाटत आहे? उत्तर नक्की द्या, असा टोमणा या युजरने शाखरुखला मारला. मात्र, शाहरुखनं यावर अतिशय शांतपणे उत्तर दिले. ‘दुआ वों में याद रखना,’ असं त्यानं लिहिलं.‘मन्नत’ पाहिल्यावरच तो विकत घेण्याचा शाहरूखनं घेतला होता. मन्नत विकत घेणं हेच, हे त्याचं खूप मोठ स्वप्न होतं. शाहरुखच्या आधी हा बंगला सलमान खान विकत घेणार होता मात्र त्यानं तसं केलं नाही आणि हा बंगला शाहरखनं विकत घेतला.

टॅग्स :शाहरुख खान