Join us
Daily Top 2Weekly Top 5

'पठाण'च्या सेटवरचा शाहरुख खानचा लूक व्हायरल, समोर आले फोटो आणि व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 15:47 IST

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या आपला आगामी सिनेमा ‘पठाण’ला चर्चेत आहे.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सध्या आपला आगामी सिनेमा ‘पठाण’ला चर्चेत आहे. त्याला सिल्वर स्क्रिनवर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर झाले आहेत. दरम्यान सोशल मीडियावर त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यातील शाहरुख खानचा लूक पाहून त्याचे फॅन्स क्रेझी झाले आहेत. याशिवाय काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत ज्यावरुन अंदाज बांधला जातो आहे की 'पठाण'ची शूटिंग सुरु झाली आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'चे शूटिंग सध्या दुबईत सुरु आहे. एक फोटोसमोर आला आहे ज्यात तो  युएईच्या टॉक शो होस्ट अनस बुकससोबत दिसत आहे.

पठाण या ॲक्शन-थ्रीलर सिनेमाचे शूटिंग शाहरुख नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. याआधी या चित्रपटाचे शूटिंग मे-जूनमध्ये सुरू होणार होते. मात्र कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, आधी या सिनेमाचे शूटिंग परदेशात होणार होते. मात्र आता बरेचसे शूटिंग मुंबईत होणार आहे. हा एक बिग बजेट सिनेमा आहे.

शाहरुख खानसोबतच या सिनेमात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोणची मुख्य भूमिका आहे. आता या सिनेमाची ऑफिशियल अनाउंसमेंट होण्याची प्रतीक्षा आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान मागील वीस महिन्यांपासून रुपेरी पडद्यापासून गायब आहे. शेवटचा तो आनंद एल राय यांच्या झिरो चित्रपटात झळकला होता.

टॅग्स :शाहरुख खान