Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरूख खानने घेतला कोरोनाचा धसका, व्हायरसच्या भीतीने केले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 11:01 IST

SEE PICS:  बच्चन कुटुंबाला कोरोना झाल्यानंतर किंगखान अलर्ट

ठळक मुद्देबच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचे बंगले सील करण्यात आले.

मुंबईत कोरोना व्हायरसचा प्रकोप वेगाने वाढतोय.  बॉलिवूडचे सेलिब्रिटीही या व्हायरसच्या तावडीतून सुटलेले नहीत. अलीकडे अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. पाठोपाठ अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनाही या व्हायरसने गाठले. बच्चन कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्यावर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतल्याचे बघायला मिळतेय. शाहरूख खान यापैकीच एक.

शाहरूखने इतका धसका घेतला की, त्याने अख्खा ‘मन्नत’ स्वत:च स्वत: सील केला. होय, कोरोनाच्या भीतीने शाहरूखने आपल्या ‘मन्नत’ बंगल्याला प्लास्टिकने अख्खे झाकून घेतले. बंगल्याच्या चारही बाजंूनी त्याने प्लास्टिक लावून घेतले. काहींच्या मते, कोराना संक्रमण टाळणे हा यामागचा उद्देश आहे. तर काहींच्या मते पावसापासून बचाव करण्यासाठी शाहरूखने असे केले. 

 ‘मन्नत’मध्ये  शाहरूख त्याची पत्नी गौरी आणि तीन मुलांसह राहतो. लॉकडाऊन झाल्यापासून याच बंगल्यात शाहरूख व त्याचे कुटुंब क्वारंटाईन आहेत.  

गेल्या आठवड्यात बॉलिवूड व टीव्ही इंडस्ट्रीतील अनेकजण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. बच्चन कुटुंबातील चार सदस्यांसह अनुपम खेर यांची आई, भाऊ व वहिनीला कोरोनाची लागण झाली. टीव्ही अभिनेता पार्थ समाथान आणि अभिनेत्री श्रेनु पारिख हेही कोरोना पॉझिटीव्ह आढळले. 

बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचे बंगले सील करण्यात आले. अमिताभ, अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या या चौघांवरही मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  अभिनेत्री रेखा यांचा सुरक्षारक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांचा बंगलाही सील करण्यात आला आहे. रेखा यांच्या बंगल्याला लागून असलेला दिग्दर्शक झोया अख्तर हिचा बंगला सुद्धा सील करण्यात आला. याआधी बोनी कपूर आणि आमिर खानच्या स्टाफलाही कोरोनाची लागण झाली होती. 

टॅग्स :शाहरुख खानकोरोना वायरस बातम्या