Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता कोणी काहीही बोलोत, शाहरूखच्या लेकीला फरक पडायचा नाय...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 16:06 IST

ट्रोलर्सला कंटाळून केले असे काही...

ठळक मुद्देतूर्तास कोरोना व्हायरसमुळे सुहाना अमेरिकेत अडकून पडली आहे.

शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या जाम चर्चेत आहे. नुकतेच सुहाना तिचे इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केले. सुहानाचे इन्स्टा अकाऊंट पब्लिक होताच, लाखो लोकांनी तिला फॉलो केले. बघता बघता सुहाना इन्स्टाची ‘स्टार’ झाली. पण  इन्स्टाची ‘स्टार’ची स्टार होणे याचा अर्थ ट्रोलिंगही आलेच. या ट्रोलिंगलाच सुहाना घाबरली. मग काय, तिने कमेंट सेक्शनच बंद केले. होय, इन्स्टाग्रामवरचे कमेंट्स डिसेबल करून तिने ट्रोलर्सपासून लांब राहण्याचा मार्ग पत्करला. म्हणजे, कमेंट्सही नकोत आणि नसती डोकेदुखीही नको असेच काही.

सुहाना खान अनेकदा ट्रोल झाली आहे. खरे तर सुहाना फार कमी मीडियासमोर येते. पण शाहरूखसारख्या बड्या स्टार्सची लेक या नात्याने सर्वांचीच नजर तिच्यावर असते. साहजिकच सुहाना साधी घराबाहेर पडली तरी त्याची बातमी होते. यावरून सुहाना अनेकदा ट्रोल झाली. कधी तिला ‘फिमेल शाहरूख’ म्हटले गेले तर कधी ‘उद्धट’. पण आता सुहानाने या सगळ्यांपासून लांब राहण्याचा मार्ग शोधलाय. याचा अर्थ आता काहीही बोला सुहानाला फरक पडायचा नाही.

अमेरिकत अडकली सुहानातूर्तास कोरोना व्हायरसमुळे सुहाना अमेरिकेत अडकून पडली आहे. अगदी घरात बंद आहे. यामुळे सुहाना कमालीची दु:खी आहे. इतकी की, तिच्या डोळ्यांत अश्रू दिसले.   जगभर थैमान घालणाºया कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे. शाहरूखची 19 वर्षांची लेक सुहाना अमेरिकेच्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिकतेय. सुहानाही कोरोनाच्या धास्तीमुळे घरात कोंडून घ्यावे लागतेय. पण यामुळे तिच्या डोळ्यांत अश्रू आलेत. सुहानाने नुकतेच इन्स्टाग्रामवर स्वत:चे काही फोटो शेअर केलेत. यात ती फुल मेकअपमध्ये दिसतेय. ओठांवर लाल लिपस्टिक, डोळ्यांत काजळ, स्टाईलिश केस. तिला पाहून बाहेर जाण्यासाठी ती रेडी झाली असावी असे वाटतेय. पण कदाचित कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे तिला घरातून बाहेर पडता आले नाही. 

टॅग्स :सुहाना खानशाहरुख खान