- क्रिती सनॉनची सीएनएक्सला विशेष मुलाखतसुंदर चेहरा आणि उत्तम अभिनय याचा अप्रतिम संगम म्हणजे क्रिती सनॉन. ‘हीरोपंती’द्वारे रुपेरी पडद्यावर अवतरलेल्या या नायिकेने या सुंदरता व अभिनयाच्या बळावरच समीक्षकांसमवेत दिग्दर्शक आणि निर्मात्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. या वर्षीचा सर्वात मोठा आणि ज्या चित्रपटाची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत तो ‘दिलवाले’ आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातही क्रिती महत्त्वाची भूमिका वठवत आहे. यानिमित्ताने तिने सीएनएक्सला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने या चित्रपटातील अभिनेत्यांसमवेत काम करतानाचा तिचा अनुभव आणि बॉलीवूडमध्ये तिची एंट्री कशी झाली हे अगदी सविस्तर सांगितले.‘दिलवाले’मधील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?मी या चित्रपटात इशिताची भूमिका केलीय. ती आधुनिक, स्वतंत्र आणि व्यवहारशील आहे. तिला जे वाटतं ते चुकीचं असो वा बरोबर ती तडक बोलून मोकळी होते. तिच्यासाठी प्रामाणिकपणा हेच तिचे सर्वस्व आहे. शाहरूख खान आणि काजोलसोबतचा अनुभव कसा राहिला?अगदी जबरदस्त अनुभव होता. त्यांच्यासोबत चित्रपटात काम करणं म्हणजे जणू आनंदपर्व आहे. शाहरूख आश्चर्यकारक अन् काजोल अद्भुत आहे. ते दोघेही महान अभिनेते आहेत. माझ्यासाठी हा शिकण्याचा क्षण होता. शाहरूख खान म्हणजे वेळेवर येणारा आणि तुम्हाला त्याच्यासोबत नेहमीच कम्फर्टेबल वाटेल असाच आहे. त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे. इतक्या वर्षांनंतरही त्याच्यातील अभिनय पाहण्याजोगा आहे. काजोल ही सातत्यपूर्ण अभिनेत्री आहे. डोळ्याद्वारे ती सारं काही बोलत असते. पडद्यावर ती अगदी वेगळी दिसते. तेलगू चित्रपट आणि बॉलीवूडच्या संस्कृतीची तुलना कशी करशील?मला भाषेशिवाय वेगळं काही वाटलं नाही. तिथले तंत्रज्ञ आणि इथले अगदी तसेच आहेत. उद्योग, अनुभव, कल्पना सारे काही सारखेच आहे. तेलगू चित्रपट उद्योगात कॅमेरा हा अधिक बोलतो. इथेही तसंच आहे.तुला दिलवाले चित्रपट कसा मिळाला?मला रोहितच्या आॅफिसमधून कॉल आला होता. स्क्रिप्टबाबत माहिती देण्यात आली. स्क्रिप्ट वाचून मला आनंद झाला. ऐकतानाच मी हो म्हटलं, कारण नुसते ऐकणे हादेखील सुंदर अनुभव होता. या चित्रपटासाठी मला कोणतीही आॅडिशन द्यावी लागली नाही.तू बी.टेक. केलेय. तांत्रिक बाजू ते कला क्षेत्र कसा फरक करशील?मी दुसऱ्या वर्षाला शिकत होते. मॉडेलिंगकडे मी छंद म्हणून पाहत होते. मला वाटले मी उत्कृष्ट नर्तक आहे. काही टीव्ही जाहिराती मी केल्या आहेत. परंतु मला कॅमेरा आवडतो. जाहिराती करताना माझ्या लक्षात आले की मी अभिनय करू शकते. तेलगूमध्ये नवा चेहरा हवा होता. मी हैदराबादला गेले आणि माझी आॅडिशन झाली. काही दिवसांनंतर माझी निवड झाल्याचा कॉल आला.समीक्षक म्हणतात, तू ‘स्टार इन द मेकिंग’ आहेस?असे ऐकायला मिळणे म्हणजे खरेच भाग्याचे लक्षण आहे. पहिल्या चित्रपटानंतर तुम्हाला असा अभिप्राय मिळणे नक्कीच कौतुकास्पद आहे. माझा पहिला चित्रपट पाहिल्यानंतर रसिक, समीक्षक आणि इंडस्ट्रीलाही तो आवडला. दिलवालेमधला लक्षात राहणारा क्षण?हैदराबाद येथे झालेले शूटिंग खूप मजेदार होते. रामोजी फिल्मसिटीमध्ये आम्ही राहत होतो. मी शाहरूख खान, काजोल आणि इतर अभिनेत्यांना भेटले. दोन्ही वरुण (वरुण धवन आणि वरुण शर्मा) यांच्याशी माझे संबंध खूप छान होते. सर्वच युनिट एका परिवाराप्रमाणे राहायचे. आम्ही सर्व जण एकत्र जेवण करायचो.तुला कोणता खान अधिक आवडतो?सलमान, शाहरूख हे दोन्ही खान उत्तम अभिनेते आहेत. अभिनयाच्या शाळेत प्रवेश घेतला होता का?मी जेव्हा मुंबईला आले तेव्हा वाटले होते की प्रशिक्षण घ्यावे, मात्र यामुळे फायदा होणार नसल्याचे अनेकांनी सांगितले. अभिनय शिकविला जाऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे होते आणि ते खरेही आहे. म्हणून मग मी काही खासगी अभिनय कार्यशाळांचा अनुभव घेतला आणि त्या बळावरच आज मी इथे आहे.
- Exclusive