Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख-ऐश्वर्या दिसणार एकत्र

By admin | Updated: December 2, 2014 02:11 IST

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या रॉय हे दिसणार आहेत.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी चित्रपटात शाहरुख खान आणि ऐश्वर्या रॉय हे दिसणार आहेत. १९५८ या वर्षी रिलीज झालेल्या किशोर कुमार आणि मधुबाला अभिनित ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटाचा रिमेक बनविण्याचा निर्णय रोहितने घेतला आहे. शाहरुख आणि ऐश्वर्या यांनी यापूर्वी ‘देवदास’ या चित्रपटात एकत्रित काम केले होते. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी रोहितने प्रथम काजोलला आॅफर दिली होती; परंतु काही कारणामुळे काजोलने चित्रपट नाकारला. त्यामुळे ऐश्वर्याला संधी देण्यात आली. प्रसूतीनंतर ऐश्वर्याने चित्रपटात पुनरागमन केले आहे. ‘जज्बा’ हा चित्रपट तिने साईन केला असून, त्यात इरफान खानसोबत ती दिसणार आहे. किशोर अणि मधुबाला यांचा ‘चलती का नाम गाडी’ हा चित्रपट हिट ठरला होता. शाहरुख आणि ऐश्वर्या हे त्यांची पुनरावृत्ती करतात काय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.