Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी शाहीर नंदेश उमप पत्नीसोबत पुन्हा लग्नबंधनात! लेकीनेच घातला घाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 12:25 IST

संसाराच्या रौप्यमहोत्सवानिमित्त नंदेश उमप पुन्हा लग्नबंधनात! लेकीने आयोजित केला शानदार सोहळा, पाहा फोटोज्

नंदेश उमप यांची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. शाहीरी बाजातली गाणी गाऊन नंदेश महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. पोवाडा, अभंग अशी विविध पद्धतीची गाणी गाऊन नंंदेश उमप यांनी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं  आहे. नंदेश उमप यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक खास गोष्ट घडली. लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त नंदेश त्यांच्या पत्नीसोबत पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले. 

अभिनेत्री, निवेदिका समीरा गुजर यांनी नंदेश उमप आणि त्यांच्या पत्नीच्या पुनश्च विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. नंदेश आणि त्यांची पत्नी सरिता या दोघांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस नुकताच झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या लेकीने एक शानदार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला अभिनेत्री सुकन्या मोनेही उपस्थित होत्या. या सोहळ्याचे फोटो व्हायरल होताच अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलंय.

फोटोमध्ये पाहायला मिळतं की, नंदेश-सरिता या दोघांनी एकमेकांना वरमाला घातलेली दिसते. याशिवाय नंदेश यांनी गुडघ्यावर बसून सरिता यांना अंगठी घातलेली दिसली. दोघांनीही एकमेकांना साजेसा असा पोशाख परिधान केला होता. नंदेश यांचे वडील हे दिग्गज गायक शाहीर विठ्ठल उमप. वडिलांचा शाहीरी वारसा नंदेश आपल्या कलेतून आणि गाण्यांतून पुढे चालवत आहेत.

टॅग्स :मराठी