Join us

शाहरूख - काजोलच्या जोडीची जादू

By admin | Updated: December 19, 2015 08:35 IST

चेन्नई एक्स्प्रेसच्या यशानंतर, दिग्दर्शक रोहित शेट्टीची टीम ‘दिलवाले’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, अशी आशा केली जात होती. तथापि, शाहरूख खानसारखा

- अनुज अलंकार

(हिंदी चित्रपट- दिलवाले)

चेन्नई एक्स्प्रेसच्या यशानंतर, दिग्दर्शक रोहित शेट्टीची टीम ‘दिलवाले’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, अशी आशा केली जात होती. तथापि, शाहरूख खानसारखा सुपरस्टार चित्रपटात असूनही असे म्हणावे लागेल की, अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट मनोरंजनाच्या कसोटीवर तितका उतरत नाही. गोव्यात कारशी संबंधित व्यवसाय करणारा (शाहरूख खान) आपला छोटा भाऊवीरसोबत (वरुण धवन) राहत असतो. वरुण हा इशितावर (कीर्ती सेनन) प्रेम करत असतो. वीर आणि इशिताची प्रेमकथा पुढे जात राहते, तर इशिताची मोठी बहीण मीरा (काजोल) आणि वीरचा भाऊ जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा हे कथानक १५ वर्षे मागे बेल्जियममध्ये जाते. वीरचा भाऊ तेव्हा काली नावाने ओळखला जायचा. जो आपल्या वडिलांचा (विनोद खन्ना) अवैध व्यवसाय सांभाळायचा. त्याच वेळी काली हा मीराशी प्रेम करत असतो. मात्र, मीराच्या बाबतीत असे सत्य समोर येते की, ती कालीचा प्रतिस्पर्धी असलेल्या समूहाच्या मालकाची (कबीर बेदी) मुलगी आहे. दोन्ही गटांतील संघर्षात काली आणि मीरा यांच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि त्यांचे नातेसंबंध संपुष्टात येतात. योगायोग असा की, दोघेही बेल्जियम सोडून गोव्यात राहायला येतात. काली कारशी संबंधित व्यवसाय सुरू करतो, तर मीराचे हॉटेल आहे. वीर आणि इशिताची प्रेमकहाणी सुरू होते तेव्हा काली आणि मीरा यांच्यातील गैरसमजही दूर होतात. अखेर ते दोघेही पुन्हा एकत्र येतात आणि हॅप्पी दी एंड होतो. उणिवा - कथानकाबाबत सांगायचे झाले तर हा चित्रपट अमिताभच्या ‘हम’ या चित्रपटासारखा वाटतो. पटकथा आणि संवाद विशेष प्रभावी नाहीत. जॉनी लिव्हर, संजय मिश्रा आणि वरुण शर्मा यांची कॉमेडी फारसा प्रभाव पाडू शकत नाही. वरुण आणि कीर्ती सेनन यांना अभिनयासाठी फारसा वाव मिळालेला नाही. बोमन इराणी, मुकेश तिवारी, कबीर बेदी, विनोद खन्ना, नवाब शाह यांना ज्युनिअर कलाकारांप्रमाणे दाखविण्यात आले आहे. चित्रपटाच्या दुबळ्या बाजंूसाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचे दिग्दर्शन जबाबदार आहे. एकूणच काय तर फक्त आणि फक्त शाहरूख व काजोल यांची जोडी हीच जमेची बाजू या चित्रपटाला यश मिळवून देऊ शकते. वैशिष्ट्ये : शाहरूख आणि काजोल यांची जोडी हेच चित्रपटाचे खास आकर्षण आहे. अर्थात वाढत्या वयाची जाणीव होत असली तरी या जोडीच्या आकर्षणावर त्याचा परिणाम होत नाही. चित्रपटाच्या गाण्यांबाबत बोलायचे तर शाहरूख-काजोल यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘गेरुआ’ तसेच ‘मनमा इमोसन जागे रे’ यांसारखी गाणी श्रवणीय आहेत. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी चांगली आहे.