बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेता शाहरुख खान कधी त्याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) तर कधी मुलगी सुहाना खान (Suhana Khan) मुळे चर्चेत येत असतो. सध्या शाहरुख खान त्याची लाडकी मुलगी सुहाना खानमुळे चर्चेत आला आहे. खरेतर, सुहाना खान सध्या एका मिस्ट्री मॅनसोबत पाहायला मिळत आहे. तेव्हापासून त्यांच्या नात्याची आणि लग्नाची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना हे जाणून घ्यायचे आहे की ते खरोखरच रिलेशनशिपमध्ये आहेत का आणि लवकरच लग्न करणार आहेत का.
असे म्हटले जात आहे की सुहाना खान आणि मिस्ट्री मॅन एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत आहेत. तसेच, दोघेही त्यांच्या नात्याबाबत खूप सीरियस आहेत. सुहाना खान आणि मिस्ट्री मॅन अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट झाले आहेत. अशीही बातमी येत आहे की सुहाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.