Join us

Beast Hindi Trailer: शाहरूख खानने पाहिला थलापति विजयच्या ‘बीस्ट’चा ट्रेलर; म्हणाला, मी विजयचा फॅन झालो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 10:32 IST

Beast Hindi Trailer: मीनर, लीनर अ‍ॅण्ड स्ट्रॉन्गर...! ‘बीस्ट’ हिंदीत ‘रॉ’ या नावाने प्रदर्शित होतोय. याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.  

Beast Hindi Trailer: येत्या 14 एप्रिलला बहुप्रतिक्षीत ‘केजीएफ 2’ आणि ‘जर्सी’ हे दोन सिनेमे चित्रपटगृहांत धडकणार आहेत आणि त्याच्या एक दिवस आधी ‘बीस्ट’ रिलीज होतोय. ‘बीस्ट’ (Beast ) हिंदीत ‘रॉ’ या नावाने प्रदर्शित होतोय. याचा ट्रेलर आलाये. मंगळवारी बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) याने हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला. ‘बीस्ट’चे दिग्दर्शक एटली यांच्यासोबत बसून एसआरकेने ट्रेलर पाहिला. यानंतर काय तर ‘बीस्ट’ आणि विजयवर (Vijay) त्यानं कौतुकाचा वर्षाव केला.

‘दिग्दर्शक एटलीसोबत बसलोय... ते सुद्धा माझ्यासारखेच विजयचे खूप मोठे फॅन आहेत. बीस्टच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा....’,असं लिहित शाहरूखने ‘बीस्ट’च्या हिंदी ट्रेलरची लिंक शेअर केली.  

‘बीस्ट’ अर्थात ‘रॉ’ हा एक अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमा आहे. यात विजयने एका स्पायची भूमिका साकारली आहे. ट्रेलरची सुरूवात होते त एका अतिरेकी हल्ल्याने. एका मॉलमध्ये अतिरेकी अनेकांना ओलिस ठेवतात. विजयही त्यात असतो. पण मग अचानक टिष्ट्वस्ट येतो. अचानक विजय या संपूर्ण घटनेचा सूत्रधार वाटू लागतो. सिनेमाच्या या ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन पाहायला मिळते.

‘बीस्ट’ची तामिळ सिनेसृष्टीत जोरदार हवा आहे. आता या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरनेही तशीच हवा केली आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे. हिंदी भाषेत हा सिनेमा 600-700 स्क्रीन्सवर रिलीज होणार असल्याचं कळतेय. याऊलट ‘केजीएफ 2’ यापेक्षाही अधिक स्क्रिन्सवर झळकणार आहे. एकंदर काय तर, बीस्ट आणि केजीएफ 2 असा थेट मुकाबला यानिमित्तानं पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :शाहरुख खानTollywood