Join us

शाहरूख, आमिर, सलमान करण जोहरच्या सिनेमा करणार समलैंगिक भूमिका

By admin | Updated: January 31, 2016 10:29 IST

समलैंगिकतेच्या पारंपरिक चौकटी मोडतानाच बॉलीवूडमधल्या तीन खानांना म्हणजे शाहरूख, आमिर व सलमानला एकत्र घेत सिनेमा बनवण्याचा विचार करण जोहर करत आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - समलैंगिकतेच्या पारंपरिक चौकटी मोडतानाच बॉलीवूडमधल्या तीन खानांना म्हणजे शाहरूख, आमिर व सलमानला एकत्र घेत सिनेमा बनवण्याचा विचार करण जोहर करत आहे. अलिगढच्या ट्रेलरच्या लाँचच्यावेळी बोलताना करण म्हणाला की, शाहरूख, आमिर व सलमान हे तिघेही पडद्यावर समलैंगिक व्यक्तिचा रोल करायला तयार होतील.
अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीमधल्या प्राध्यापकाला समलैंगिक असल्यामुळे नोकरीला मुकावं लागतं, यावर अलिगढ हा सिनेमा बेतलेला आहे. यातली प्राध्यापकाची भूमिका मनोज बाजपेई करत आहे. तर राजकुमार रावने पत्रकाराची भूमिका केली आहे.
जर चांगली पटकथा असेल, विषय चांगला मांडला असेल तर तिनही खान नक्कीच अशी भूमिका करतील असं करणनं म्हटलंय.
करणने याआधीही दोस्ताना, मुंबई टॉकीजमध्ये होमोसेक्स्युअॅलिटी हा विषय हाताळलेला आहे. त्यामुळे करणच्या पुढच्या सिनेमामध्ये तीन खान एकत्र येतील का हे बघणं औत्सुक्याचं आहे.