Join us
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रकुमार काढणार ‘दिल’चा सीक्वल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 01:35 IST

नि र्माता इंद्रकु मार हा अ‍ॅडल्ट कॉमेडीजसाठी प्रसिद्ध आहे, पण अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद, यांच्यामुळे त्यांनी आता १९९० च्या ‘दिल’ चित्रपटाचा सीक्वल काढायचे ठरवले आ

नि र्माता इंद्रकु मार हा अ‍ॅडल्ट कॉमेडीजसाठी प्रसिद्ध आहे, पण अशा चित्रपटांना प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद, यांच्यामुळे त्यांनी आता १९९० च्या ‘दिल’ चित्रपटाचा सीक्वल काढायचे ठरवले आहे. चित्रपटाविषयी बोलताना इंद्रकुमार म्हणतात, ‘आम्ही या वर्षाच्या शेवटी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत. मी या प्रोजेक्टविषयी खूप उत्साहित आहे. ‘दिल’ चित्रपट माझ्या हृदयाजवळचा आहे. आम्ही सध्या स्टारकास्टवर विचार करतो आहोत. तो चित्रपट हिट झाला होता. आताही आम्ही प्रेक्षकांना नाराज करणार नाही. तो आम्ही एकदम स्पेशल बनवणार आहोत. रोमँटिक चित्रपट मला बनवायचा आहे. ‘दिल’मध्ये आमीर खान आणि माधुरी दीक्षितची केमिस्ट्री अतिशय उत्तम होती. आताही आम्हाला तसेच स्टारकास्ट निवडावे लागतील.’