Join us  

ऋतु के नाम की मेहंदी रच रही है शायद..., Sayali Sanjeevचा व्हिडीओ पाहून चाहते ‘सैराट’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:21 PM

Sayali Sanjeev Video : मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवची पोस्ट पडली रे पडली की, तिच्या कमेंट बॉक्समध्ये एकाच नावाची चर्चा होताना दिसते. ते नाव म्हणजे धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड याचे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून सायली संजीव व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी सायलीच्या एका फोटोवर ऋतुराजने ‘व्वा’ अशी कमेंट केली होती.

मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवची (Sayali Sanjeev ) पोस्ट पडली रे पडली की, तिच्या कमेंट बॉक्समध्ये एकाच नावाची चर्चा होताना दिसते. ते नाव म्हणजे धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याचे. होय, गेल्या काही दिवसांपासून सायली व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. आता काय तर त्यांच्या लग्नाची चर्चाही सुरू झालीय. या चर्चेला कारण ठरला तो सायलीनं शेअर केलेला एक व्हिडीओ.होय, सायलीने काही तासांपूर्वी इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत सायली हातावर मेहंदी काढताना दिसतेय आणि बॅकग्राऊंडला ‘मेहंदी है रचनेवाली’ हे गाणं वाजतंय. सायलीनं हा व्हिडीओ शेअर केला आणि चाहत्यांनी तिच्या या व्हिडीओवर एकापेक्षा एक कमेंट्स केल्या.

काहींनी तर थेट लग्नाची तयारी का? असा थेट प्रश्न विचारला. अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. ऋतु के नाम की मेहंदी रच रही है शायद, अशी कमेंट एका चाहत्याने केली. ऋतुराजला आज झोप यायची नाही, अशी कमेंट अन्य एकाने केली. गेल्या काही दिवसांपासून सायली संजीव व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. मध्यंतरी सायलीच्या एका फोटोवर ऋतुराजने ‘व्वा’ अशी कमेंट केली होती. त्याच्या या कमेंटला सायलीने देखील रिप्लाय दिला होता. तिने त्यावर हार्ट इमोजी सेंड केले होते. सायलीचा हा रिप्लाय पाहून दोघांमध्ये मैत्रीपलीकडचे नाते असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चा अद्यापही सुरू आहेत.आयपीएल गाजवून पुण्यात आल्यानंतर ऋतुराजचं जंगी स्वागत करण्यात आलं.  ऋतुराज सध्या पुण्यात आहे आणि सायलीच्या हातावर मेहंदी सजलीये. याचाच संबंध चाहत्यांनी जोडला आहे. 

टॅग्स :सायली संजीवऋतुराज गायकवाड