Join us

सावली आणि तुळजा आल्या एकत्र, थिरकल्या गाण्यावर, व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:12 IST

Mrunmayee Gondhlekar and Prapti Redkar : तुळजा आणि सावली म्हणजेच मृण्मयी गोंधळेकर आणि प्राप्ती रेडकर एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून रिल बनवला. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

झी मराठी वाहिनीवरील 'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Aamcha Dada Serial) आणि 'सावळ्याची जणू सावली' (Savalyanchi Janu Savali Serial) या मालिकांचा महासंगम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील जगताप आणि मेहेंदळे बिझनेस निमित्त एकत्र आले होते. या मालिकांच्या शूटिंगनिमित्त या मालिकेचे कलाकारदेखील एकत्र आले होते. या मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या नायिका तुळजा आणि सावली म्हणजेच मृण्मयी गोंधळेकर (Mrunmayee Gondhalekar) आणि प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) एकत्र आल्या होत्या आणि त्यांनी शूटिंगच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून रिल बनवला. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

मृण्मयी गोंधळेकर हिने इंस्टाग्रामवर प्राप्ती रेडकरसोबतचा रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये त्या दोघी त्यांच्या मालिकेतल्या लूकमध्ये दिसत आहेत. त्या दोघी माय बेस्टी या इंग्रजी गाण्यावर डान्स करत आहेत. या गाण्यावर त्यांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री स्नेहलता माघाडे हिने शूट केला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

वर्कफ्रंटप्राप्ती रेडकर टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. आतापर्यंत तिने किती सांगायचंय मला, तू माझा सांगाती, मेरे साई आणि काव्यांजली अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती सावळ्याची जणू सावली या मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने साकारलेली सावली रसिकांना खूप भावली आहे. तर मृण्मयी गोंधळेकरबद्दल सांगायचं तर तिनेदेखील बऱ्याच मालिकेत काम केले आहे. ती 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत दिसली होती. यात तिने राजमाची भूमिका साकारली होती. 'यशोदा गोष्ट श्यामच्या आईची' या मालिकेतही तिने महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता ती 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत तुळजाची भूमिका साकारत आहे. या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळते आहे. 

टॅग्स :झी मराठी