Join us

सासूबाईंना वाटतं मी सेक्सी व ग्लॅमरस दिसावं - करिना

By admin | Updated: June 23, 2015 14:06 IST

दबंग -२ मधील फेव्हिकॉल हे गाणं माझ्या सासूबाईंच आवडत गाण असून मी नेहमी सेक्सी व ग्लॅमरस दिसावं असे त्यांना वाट असल्याचे अभिनेत्री करिना कपूरने म्हटले आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २३ - दबंग -२ मधील फेव्हिकॉल हे गाणं माझ्या सासूबाईंच आवडत गाण असून मी नेहमी सेक्सी व ग्लॅमरस दिसावं असे त्यांना वाट असल्याचे अभिनेत्री करिना कपूरने म्हटले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या करिना कपूरच्या सासूबाई असून त्या माझ्यासाठी प्रेरणादायी स्त्री असल्याचे करिनाने स्पष्ट केले आहे. 
करिना कपूर सध्या बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त असून या निमित्त तिने वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. यात करिनाने सासू शर्मिला टागोर यांच्याविषयी भाष्य केले. लग्नानंतरही करिअर व घर सांभाळण्याची अवघड धुरा शर्मिला टागोर यांनी समर्थपणे पार पाडली. याबाबतीत त्या माझ्यासाठी आदर्श आहेत असे करिना अभिमानाने सांगते. त्यांना गाणी आणि नृत्य आवडत असून माझे दबंग २ मधील फेव्हिकॉल हे गाणे त्यांचे आवडते गाणे आहे . मी नेहमी ग्लॅमरस व सेक्सी दिसावं असे त्यांना वाटते असे करिना सांगते. शर्मिला टागोर व हेमामालिनी या माझ्या आवडत्या अभिनेत्री असून त्या दोघींही सर्वोत्तम अभिनेत्री असल्याचे करिनाचे म्हणणे आहे.