Join us

'सारेगमप' लिटिल चॅम्प्स फेम प्रथमेश- मुग्धाचं पार पडलं ग्रहमख, पारंपरिक लूकमधील फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 10:03 IST

प्रथमेश- मुग्धाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून नुकतेच दोघांचं ग्रहमख पार पडलं आहे

मराठी मनोरंजनसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. प्रसाद-अमृता, पियुष-सुरुची नंतर आता आणखी एका कपलची लग्नाची लगबग सुरु झाली आहे. ते कपल म्हणजे 'सा रे ग म प लिटिल चॅम्प' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन (Prathamesh Laghate-Mugdha Vaishampayan). दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून नुकतेच दोघांचं ग्रहमख पार पडलं आहे, ज्याचे फोटो शेअर केले होते. 

मुग्धाने ग्रहमखच्या वेळी निळ्या रंगाची साडी परिधान केली होती. यात मुग्धा खूपच सुंदर दिसत होती. मुग्धाच्या घरी पाहुण्याची लगबग सुरु झाली आहे. घरी फुलांनी सजावट करण्यात करण्यात आली आहे. हे तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसतेय. मुग्धा प्रमाणे प्रथमेशनेही त्याच्या ग्रहमखचे फोटो शेअर केले आहेत. 

मुग्धा प्रमाणेच प्रथमेशचं घरही जवळचे नातेवाईक आणि पाहुण्यांनी भरलेले त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसतेय. अगदी पारंपरिक पद्धतीने दोघांचं ग्रहमख पार पाडलं आहे. फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छा देत कमेंटसचा वर्षाव केला आहे.  'सा रे ग म प लिटिल चॅम्प' फेम मोदक आणि मॉनिटर म्हणजेच प्रथमेश आणि मुग्धाने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. हे कळताच चाहत्यांना सुखद धक्काच बसला. ही सुरेल जोडी एकत्र येत असल्याने चाहत्यांना खूपच आनंद झाला.   

प्रथमेश आणि मुग्धाची भेट अगदी लहान वयातच सारेगमप शोमध्ये झाली. दोघांच्याही गाण्याचा जॉनर एक असल्याने नंतर त्यांनी एकत्र शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम केले. तेव्हाच दोघांचे सूर जुळले. मुग्धा प्रथमेशला आता वधू आणि वराच्या रुपात बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :सा रे ग म पसेलिब्रिटी