Join us  

"तुझ्याबरोबर काम करुन मला.."; सारंगने ऑन स्क्रीन बायको मुक्ताला दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:00 AM

मुक्ता बर्वेचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त सारंगने खास पोस्ट लिहित लाडक्या राणीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. (naach ga ghuma, mukta barve, sarang sathaye)

आज मुक्ता बर्वेचा वाढदिवस. मुक्ताने आजवर सिनेमा असो, नाटक असो वा मालिका. विविध माध्यमांत तिने अभिनयाची छाप सोडली आहे. ललित कला केंद्रातून सुरु झालेला पुण्याचा प्रवास आज 'नाच गं घुमा' पर्यंत येऊन ठेपलाय. मुक्ताच्या 'नाच गं घुमा' सिनेमाला प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळतोय. अशातच 'नाच गं घुमा'मधील मुक्ताचा ऑनस्क्रीन नवरा म्हणजेच सारंग साठेने त्याच्या लाडक्या राणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

सारंगने मुक्तासोबतचे खास फोटो शेअर करुन लिहिलंय की, "प्रिय राणी ! हा आनंद , तुझ्या बरोबर काम करून इतका आनंदी आहे , की त्याच्या चेहऱ्या वरचा आनंद इतक्यात तरी पुसला जाणार नाही . माझ्या आयुषात हा परमानंद आणल्या बद्दल आभार सखे ! तुझा हा वाढदिवस आणि येणारे पुढील वर्ष आनंदात जाऊदे ! तुझा आनंद !" सारंगने लिहिलेल्या या पोस्टखाली लोकांनी मुक्ताला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

मुक्ता बर्वेबद्दल सांगायचं तर.. 'मुंबई पुणे मुंबई', 'जोगवा', 'मुंबई पुणे मुंबई 2', 'एक डाव धोबीपछाड', 'आपडी थापडी', 'YZ', 'डबल सीट' अशा सिनेमांमधून मुक्ताने अभिनयची छाप सोडली आहे. मुुक्ताने २०२४ मध्ये 'अलीबाबा आणि चाळीशीतले चोर' आणि 'नाच गं घुमा' या दोन सिनेमांमध्ये काम केलंय. त्यापैकी 'नाच गं घुमा' सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. मुक्ताला आज तिचे चाहते वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा देत आहेत.

टॅग्स :मुक्ता बर्वेमराठी