Join us

VIDEO : सर्वांसमोर कार्तिक आर्यनवर भडकली सारा अली खान; नेमके घडले काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 15:52 IST

व्हिडीओ बघा ना...

ठळक मुद्देसारा व कार्तिकचा ‘लव्ह आज कल’ हा सिनेमा उद्या शुक्रवारी रिलीज होतोय. इम्तियाज अलीने तो दिग्दर्शित केला आहे.

सारा अली खान आणि कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा ‘लव्ह आज कल’ सध्या जाम चर्चेत आहे.  पण त्याहीपेक्षा चर्चेत आहे ती सारा व कार्तिकची आॅफस्क्रिन केमिस्ट्री. सारा व कार्तिक एकमेकांना डेट करत असल्याचे मानले जात आहे. मध्यंतरी दोघांच्या ब्रेकअपची बातमीही आली. नेमके काय खरे हे कुणालाही ठाऊक नाही. पण हो, कार्तिक व साराच्या डोळ्यांतील एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी मात्र लपता लपत नाही. आता हा व्हिडीओच बघा ना. नुकत्याच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सारा कार्तिकवर जाम भडकली. अर्थात काळजीपोटी.  

(साभार)

सारा आणि कार्तिक सिनेमाच्या प्रमोशनसाठी एक युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पोहोचले होते. त्यावेळी सारा कार्तिकवर जाम भडकलेली दिसली. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये कार्तिक एका बसवर चढलेला दिसत आहे. याचदरम्यान मी बसवरून उडी मारत असल्याचे तो साराला सांगतो आणि सारा भडकते. तुला जे वाटेल ते कर असे म्हणत ती  तिथून निघून जाताना दिसते.

 अलीकडे एका डान्स शो दरम्यान कार्तिकच्या हाताला दुखापत झालेली आहे. त्यामुळे कार्तिक बसवरून उडी मारणार, हे ऐकताच साराने त्याला असे न करण्याचे बजावले. पण कार्तिक ऐकेना म्हटल्यावर तिचा पारा चढला. मग काय, तुझी मर्जी, करायचे ते कर म्हणत ती तिथून निघाली. मात्र याऊपरही कार्तिकने तिचे ऐकले नाहीच आणि त्याने बसवरून उडी मारलीच. ही गोष्ट साराला अजिबात आवडली नाही.सारा व कार्तिकचा ‘लव्ह आज कल’ हा सिनेमा उद्या शुक्रवारी रिलीज होतोय. इम्तियाज अलीने तो दिग्दर्शित केला आहे.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यन