Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारा अली खानसोबत दिसणारा हा मिस्ट्री बॉय आहे तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 18:46 IST

साराचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला असून या फोटोत ती एका मिस्ट्री बॉय सोबत दिसत आहे. हा मिस्ट्री बॉय कोण आहे याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

ठळक मुद्देसारासोबत असलेल्या 'मिस्ट्री बॉय'चं नाव जहान हांडा असून तो तिचा मित्र असल्याचे म्हटले जाते.

सारा अली खान तिच्या व्यवसायिक आयुष्याइतकीच तिच्या खाजगी आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. तिचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला असून या फोटोत ती एका मिस्ट्री बॉय सोबत दिसत आहे. हा मिस्ट्री बॉय कोण आहे याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

सारासोबत असलेल्या 'मिस्ट्री बॉय'चं नाव जहान हांडा असून तो तिचा मित्र असल्याचे म्हटले जाते. त्या दोघांचे समुद्रकिनाऱ्यावरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जहान केदारनाथ या चित्रपटाचा असिस्टंट डायरेक्टर होता. 

साराने 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमानंतर तिच्याकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स होत्या. अल्पावधीतच तिने साऱ्यांची वाहवा मिळवत इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. ३१ मिलियनपेक्षाही अधिक तिच्या फॉलोअर्सची संख्या आहे. साराला भटकंतीचीही फार आवड आहे. अधून- मधून भाऊ इब्राहिम आणि आई अमृता सिंगसह ती व्हॅकेशनवरही जात असते.

टॅग्स :सारा अली खान