Join us  

सारा अली खानचा 'ए वतन मेरे वतन' ओटीटीवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 1:32 PM

अभिनेत्री सारा अली खानचा 'ए वतन मेरे वतन' हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला.

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेल्या 'ए वतन मेरे वतन' सिनेमाची खुप उत्सुकता होती. कन्नन अय्यर दिग्दर्शित सारा अली खानचा हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला. पण प्रश्न आहे की सिनेमा कोणत्या ओटीटी  प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे ? तर हे आपण जाणून घेऊया. 

देशभक्तीवर किंवा प्रसिद्ध व्यक्तिमत्वाची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. पण, सारानं हे आव्हान पेललं आहे. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनावर आधारित असलेला हा सिनेमा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या एका अतिशय खास आणि वेगळ्या पैलूची कथा दाखवतो. सिनेमा उषा मेहता यांच्या आयुष्यावर आहे. सारा अली खान हिनं उषा मेहतांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा अ‌ॅमेझॉन प्राइन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

उषा मेहता यांनी गुप्त रेडिओच्या माध्यातून भारतातील तरुणांना ब्रिटीश राजवटी विरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. यामुळे ब्रिटीशांविरोधातल्या स्वातंत्र्यलढ्याला एक नवी दिशा मिळाली. सारा अली खानचा हा नवा सिनेमा २१ मार्चला प्राइम व्हिडिओवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट धर्मा एंटरटेनमेंट प्रोडक्शन द्वारे निर्मित असून करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. याशिवाय चित्रपटात सचिन खेडेकर, अभय वर्मा, स्पर्श श्रीवास्तव, ॲलेक्स ओ'नील आणि आनंद तिवारी हे स्टार्सही झळकले आहेत.

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडसेलिब्रिटी