Join us

मतदान करुन बाहेर आल्यावर सान्या मल्होत्राने अनुभवला विचित्र प्रकार, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 18:35 IST

सान्या मल्होत्रा मतदान केल्यानंतर तिच्यासोबत एक वेगळाच प्रकार घडलाय. काय घडलं जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (sanya malhotra)

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी सकाळी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या 49 संसदीय मतदारसंघांमध्ये कडेकोट सुरक्षा आणि बंदोबस्तात मतदान सुरू झाले. मतदान सकाळी 7 वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. ६ वाजेपर्यंत रांगेत उभे असलेल्यांना मतदान करण्याची परवानगी आहे. अशातच मतदान करुन केंद्राबाहेर आलेल्या अभिनेत्री सान्या मल्होत्राला विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलं.

झालं असं की.. अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​देखील तिच्या नियुक्त मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहोचली होती. मतदान करुन बाहेर येताच सान्या जवळपास हादरलीच. झालं असं की सान्या रस्ता ओलांडत होती. इतक्यात एक कॅमेरामन धावत आला अन् तिला जवळपास धडकलाच. त्याच्या कॅमेराचं टोक सान्याच्या चेहऱ्यावर लागलं असतं. पण सान्याने वेळीच स्वतःचा बचाव केला. या घटनेने सान्याला धडकी भरली.

सान्या त्या फोटोग्राफरला म्हणाली, “अरे आरामात. तुम्हाला फोटो काढायचे असतील तर बाजूला जाऊ." अशाप्रकारे वोटींगसाठी गेलेल्या सान्याला हा विचित्र अनुभव मिळाला. सान्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. ती शेवटी शाहरुख खानसोबत जवान सिनेमात दिसली. सान्या आता शाहीद कपूरसोबत देवा, याशिवाय औरो में कहा दम था, वेदा अशा सिनेमांमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :सान्या मल्होत्रामराठीमराठी अभिनेतामहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा