अखेर संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण हे काय? इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होत नाही तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीकही झाला. होय, सोशल मीडियावर हा चित्रपट लीक झाल्याचे संदेश फिरत आहेत. ‘संजू’ लीक झाला आणि तोही एचडी क्वालिटीमध्ये, असे मॅसेज वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेत. साहजिकच चित्रपट आॅनलाईन लीक झाल्याने मेकर्सचे धाबे दणाणले. ‘संजू’चा लीड अॅक्टर यानंतर लगेच समोर आला आणि त्याने आपल्या चाहत्यांना आॅनलाईन लीक झालेला चित्रपट डाऊनलोड न करण्याचे व पायरसी न वाढवण्याचे आवाहन केले. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ‘संजू’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी आॅनलाईन लीक झाला. या लीकमुळे साहजिकचं ‘संजू’च्या बिझनेसवर परिणाम होण्याचा धोका वाढला आहे.तूर्तास सोशल मीडियावर या लीक प्रकरणावरून मॅसेजचा पूर आला आहे. रणबीरचे चाहते, पायरसीला प्रोत्साहन न देण्याचे आवाहन करताहे तर काहींनी यानिमित्ताने सेन्सॉर बोर्डाला धारेवर धरले आहे. सेन्सॉर बोर्डाला चित्रपटातील टॉयलेट लिकेजच्या सीनवर आक्षेप आहे. पण चित्रपट लीक झाल्याबद्दल काहीही अडचण नाही, असे एका युजरने लिहिले आहे.
OMG! रिलीज होताच लीक झाला ‘संजू’; रणबीर कपूरने चाहत्यांना केले पायरसी रोखण्याचे आवाहन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 14:09 IST
अखेर संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला ‘संजू’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण हे काय? इकडे चित्रपटगृहांत प्रदर्शित होत नाही तोच हा चित्रपट इंटरनेटवर लीकही झाला.
OMG! रिलीज होताच लीक झाला ‘संजू’; रणबीर कपूरने चाहत्यांना केले पायरसी रोखण्याचे आवाहन!
ठळक मुद्दे होय, सोशल मीडियावर हा चित्रपट लीक झाल्याचे संदेश फिरत आहेत. ‘संजू’ लीक झाला आणि तोही एचडी क्वालिटीमध्ये, असे मॅसेज वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेत.