Join us  

'डांसिंग अंकल' मुंबईत दाखल, मिळाली बॉलिवूड ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 4:26 PM

त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली आहे की, आता त्यांना बॉलिवूड ऑफरही मिळाल्याचे बोलले जात आहे.  

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात आपल्या डान्समुळे मध्य प्रदेश संजीव श्रीवास्तव हे चर्चेत आले आहेत. एका लग्नात केलेल्या डान्समुळे संजीव श्रीवास्तव हे रातोरात लोकप्रिय झाले आहेत. त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली आहे की, आता त्यांना बॉलिवूड ऑफरही मिळाल्याचे बोलले जात आहे.  

संजीव श्रीवास्तव यांच्या डान्सला अजूनही मोठी पसंती मिळत आहे. पुन्हा पुन्हा त्यांचा डान्स पाहिला जात आहे. सर्वसामान्यांसोबतच अनेक बॉलिवूड स्टार्सनेही त्यांच्या डान्सचं कौतुक केलंय. यात अनुष्का शर्मा, अर्जून कपूर, सुनील शेट्टी आणि स्वत: गोविंदा यांचा समावेश आहे. आता संजीव श्रीवास्तव यांनी बॉलिवूडकडूनही ऑफर मिळत असून ते  मिटींगसाठी नुकतेच मुंबईत पोहोचले आहेत.  

एका मुख्य इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजीव यांनी सांगितले की, ते सध्या मुंबई आहेत आणि सुनील शेट्टी यांच्या घरी मिटींगमध्ये बिझी आहे'. तसेच ते म्हणाले की, मला फारच आश्चर्य वाटतंय. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी माझं अभिनंदन केलंय. मला विदीशा नगर निगमने ब्रॅंड अॅम्बेसेडर केलंय. आणि बॉलिवूड कलाकारांकडूनही कौतुक केलं जातंय. 

संजीव श्रीावास्तव हे सध्या भाभा रिसर्च इन्स्टिट्यूट भोपाळ येथे प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत. त्यांना लोक प्रेमाने डब्बू असेही म्हणतात. आता ते मुंबईत आले असून त्यांना काय ऑफर मिळणार आहे हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.  

टॅग्स :बॉलिवूड