Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय जाधवच्या ‘लकी’ सिनेमातील कलाकारांबद्दल वाढतेय उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 15:25 IST

संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपट ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

ठळक मुद्दे'लकी' चित्रपट ७ डिसेंबरला प्रदर्शित

सध्या सोशल मीडियावर संजय जाधव ह्यांच्या 'लकी' सिनेमाची सर्वाधिक चर्चा आहे. गेल्या एका आठवड्यापासून ‘लकी’ सिनेमा सोशल मीडियावर ट्रेंडिंग होतो आहे. ह्याचे मुख्य कारण आहे ह्या सिनेमाची स्टारकास्ट. 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणेंची निर्मिती असलेला संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' चित्रपट ७ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

संजय जाधवचा चित्रपट लकीची घोषणा २ जुलैला करण्यात आली होती. पण त्यानंतर गेला एक महिना प्रोडक्शन हाऊसकडून स्टारकास्टबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती. फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनुसार, लकीने फिल्म इंडस्ट्रीसह सिनेरसिकांचीही गेले एक महिना उत्सुकता ताणून धरली होती. असे फक्त बॉलिवूड सिनेमांबाबतच होते. गेला एक महिना ह्या सिनेमाची स्टारकास्ट कोण असेल? ह्याविषयी सिनेसृष्टीत जोरदार चर्चा होती आणि मग अचानक सोशल मीडियावर एकामागून एक ए-लिस्टर सेलेब्सचे पोस्ट पाहायला मिळाले.पहिल्यांदा उमेश कामत, मग सिद्धार्थ जाधव, त्यानंतर सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे, सोनाली खरे, अमेय वाघ अशा ए-लिस्टर मराठी सेलेब्सनी तेच ‘लकी’ असल्याचे म्हटले आहे. सूत्रांनुसार, एवढी तगडी स्टारकास्ट एका सिनेमात पाहायला मिळणे हा तर दुग्धशर्करा योग आणि एवढ्या कलाकारांना एका सिनेमात आणणे फक्त संजय जाधवच करू शकतात. असा मल्टिस्टारर सिनेमा पाहणे, ही तर सिनेरसिकांसाठी पर्वणीच असेल. रोज ह्या सिनेमाविषयी सिनेइंडस्ट्रीतले एक-एक मोठमोठे सेलेब्स ते लकी असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.लकीच्या स्टारकास्टची अनाउन्समेन्ट 'बी लाइव्ह प्रॉडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' लवकरच 7 सप्टेंबरला करणार आहे. पण तोपर्यंत ह्या बिग बजेट आणि मोस्ट अवेटेड सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये अजून कोण कोण सामिल होते आहे. ते सोशल मीडियावरून कळेलच.  

टॅग्स :संजय जाधव