Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय जाधवला मिळाले खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 13:32 IST

यंदाचा वाढदिवस संजय जाधवसाठी खूप स्पेशल ठरला.

ठळक मुद्देसंजय जाधवला http://imsanjayjadhav.com ही वेबसाइट भेट म्हणून दिली आहे.संजय जाधव म्हणाला ही वेबसाइट माझ्यासाठी सरप्राईज होते.

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व अभिनेता संजय जाधवचा आज वाढदिवस असून दरवर्षी वाढदिवसाच्या दिवशी त्याला त्याच्या मित्र-मंडळी आणि चाहत्यांकडून भरपूर गिफ्ट्स येतात. मात्र यंदा वाढदिवसादिवशी त्याला व त्याच्या चाहत्यांना आगळे गिफ्ट मिळाले आहे. 

संजय जाधवच्या संपूर्ण कारकीर्दीचा आढावा घेणारी http://imsanjayjadhav.com ही वेबसाइट भेट म्हणून दिली आहे. इतकेच नाही तर संजय जाधवच्या टीमने आणि त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक सरप्राइज बर्थ डे पार्टी काल रात्री ठेवली होती. या बर्थडे पार्टीत संजय जाधवचे स्वागतही आगळ्या पद्धतीने करण्यात आले. तसेच या बर्थ डे पार्टीला मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळीदेखील उपस्थित होते. त्यामुळे यंदाचा वाढदिवस संजय जाधवसाठी खूप स्पेशल होता. त्यामुळे तो खूप खूश होता.

 संजय जाधवच्या टिमने ही वेबसाइट त्यांना वाढदिवसाची भेट म्हणून दिली आहे. याविषयी संजय जाधवच्या 'दुनियादारी', 'तूहिरे', 'प्यारवाली लव्हस्टोरी' आणि 'गुरू' या चित्रपटाचे निर्माते आणि बिझनेस पार्टनर दिपक राणे म्हणाले की, 'दादांचा (संजय जाधव) वाढदिवस हा आमच्या पूर्ण टिमसाठी खूप मोठा सण असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी खास आम्हाला  करायचे होते. म्हणूनच यंदा टिमने त्यांना ही वेबसाइट भेट दिली आहे. आम्हाला आशा आहे की, त्यांच्या चाहत्यांनाही ही वेबसाइट खूप आवडेल.'तर याबाबत संजय जाधवने सांगितले की, 'ही वेबसाइट माझ्यासाठी सरप्राईज होते. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी उठल्यावर हा सुखद आश्चर्याचा धक्का मिळाला. सध्या आनंद व्यक्त करायला मला शब्द अपूरे पडत आहेत.' 

 

टॅग्स :संजय जाधव