Join us

सॅमसंग नोट सेव्हनला अमिताभही कंटाळले

By admin | Updated: October 1, 2016 22:30 IST

खराब बॅटरीमुळे चर्चेत असलेल्या सॅमसंगच्या नोट सेव्हन या स्मार्ट फोनला खुद्द बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चनही कंटाळले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १ - खराब बॅटरीमुळे चर्चेत असलेल्या सॅमसंगच्या नोट सेव्हन या स्मार्ट फोनला खुद्द बॉलिवूडचे शेहनशहा अमिताभ बच्चनही कंटाळले आहेत. अमिताभ यांचा सॅमसंग नोट ७ ची बॅटरी फक्त ६० टक्क्यांपर्यंतचं चार्ज होते. ही बॅटरी पूर्ण १०० टक्के कधी चार्ज होणार असा सवाल अमिताभ यांनी टि्वटरवरुन सॅमसंगला विचारला आहे. 
 
मिस्टर सॅमसंग लवकर उत्तर द्या असे अमिताभ यांनी म्हटले आहे. या फोनची बॅटरीबद्दल अनेक तक्रारी आहेत. नोट ७ अजूनही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नाही. नोट ७ बद्दल विविध तक्रारी आल्यानंतर अजूनही सॅमसंगने नोट ७ ची विक्री भारतात सुरु केलेली नाही. 
 
मिस्टर सॅमसंग माझ्या नोट सेव्हनची बॅटरी १०० टक्के कधी चार्ज होणार. लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करा. अन्यथा मला सॅमसंग ऐवजी आयफोनचा पर्याय निवडावा लागेल असे अमिताभ यांनी आपल्या एफबी पोस्टमध्ये म्हटले आहे.