Join us

'लक्ष्मी सदैव मंगलम्'च्या सेटवर समृद्धीला भेटली 'ही' नवी मैत्रिण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 08:30 IST

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवर लक्ष्मी, आर्वी आणि ओमप्रकाश यांची बरीच गट्टी जमली आहे. यातच लक्ष्मी म्हणजेच समृद्धीची अजून एक मैत्रीण सेटवर भेटली आहे.

ठळक मुद्देध्या मालिकेमध्ये आर्वी आणि मल्हारच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे.

कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवर लक्ष्मी, आर्वी आणि ओमप्रकाश यांची बरीच गट्टी जमली आहे, या तिघांमध्ये चांगली मैत्री देखील झाली आहे. सेटवर यांची बरीच धम्माल मस्ती सुरु असते. एकत्र जेवणे, सीनच्या मधल्या वेळेमध्ये गेम खेळणे, एकमेकांसोबत मज्जा मस्ती करणे. यामध्येच लक्ष्मी म्हणजेच समृद्धीची अजून एक मैत्रीण सेटवर बनली आहे. जी तिच्या मागे मागे करत असते, सतत ती जिथे जाईल तिथे ती जाते. आणि त्या मैत्रिणीचं नावं आहे जेली. तुम्हाला आता प्रश्न पडेल कि, ही जेली कोण आहे ? आर्वी म्हणजेच सुरभी आणि लक्ष्मीच्या मैत्री बद्दल तर सगळ्यांच माहिती आहे. आता जेली म्हणजेच मांजरीचं गोंडस, लहान पिल्लू आहे. जे लक्ष्मीच्या अवतीभवती सेटवर वावरताना दिसते. तिची आणि लक्ष्मीची चांगलीच मैत्री झाली आहे. लक्ष्मी सेटवर आली कि, तिच्या मागे जाते आणि जो पर्यंत ती तिला भेटत नाही तो पर्यंत ती तिकडेच उभी रहाते. समृद्धीला विचारल्यास ती म्हणाली “मला मांजरी आणि कुत्रे खूप आवडतात. जेलीला बघितल्यावरच तीने माझं मनं जिंकलं. सकाळी नाश्ता करताना मी पावाचा एक तुकडा न विसरता तिच्यासाठी ठेवते असे देखील तिने सांगितले”. जेली हे नावं जरा वेगळे आहे आणि कसे सुचले असं विचारताच ती म्हणाली, “ती खूपच वळवळी आहे हातातून निसटून जाते म्हणून तिचं नावं जेली ठेवलं”.   

मुक्या प्राण्यांशी एकदा नातं जोडलं गेलं कि ते तुटण कठीण असते, त्यांचा लळा अगदी लगेच लागतो. हे अगदीच खरं आहे. सीन मधून जसा वेळ मिळतो तसं मी तिच्याशी खेळते, तिला खायला देते. सेटवर तसा वेळ कमीच मिळतो पण, मी प्रयत्न करते असे समृद्धी म्हणाली. सध्या मालिकेमध्ये आर्वी आणि मल्हारच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे. तसेच आर्वी आणि लक्ष्मी मधील मैत्री देखील हळूहळू अजूनच घट्ट होत चालली आहे. यामध्ये नाराज झालेल्या लक्ष्मीसाठी आर्वी एक सरप्राईझ गिफ्ट घेऊन येते आणि ते म्हणजे मोबाईल. आर्वी तिला हे देखील सांगते कि, याद्वारे आपण एकमेकींशी बोलू शकतो. आर्वी तिला मोबाईल कसा वापरावा हे देखील सांगते. लक्ष्मीला आर्वीचे हे सरप्राईझ गिफ्ट आवडेल का ?

टॅग्स :कलर्स मराठी