Join us
Daily Top 2Weekly Top 5

रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत फिरताना दिसली समांथा, रोमँटिक फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:12 IST

रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसली समांथा!

Samantha Raj Nidimoru: 'द फॅमिली मॅन' या वेबसीरिजचे दिग्दर्शक राज निदिमोरु आणि दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री समांथा रुथ प्रभू  (Samantha Ruth Prabhu) यांच्या नात्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. गेल्या काही महिन्यांत दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. डेटिंगच्या चर्चांवर दोघांपैकी कुणीच काही थेट बोललेलं नसलं तरी त्यांच्यातील जवळीकता सर्व काही सांगून जात आहे. समांथानं नुकतंच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यात ती पुन्हा एकदा राज निदिमोरूसोबत दिसून आली आहे.

समांथानं अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. ती एका रेस्टॉरंटमध्ये बसून हसताना दिसतेय. काही फोटोंमध्ये ती एका सुंदर ठिकाणी पोज देताना दिसत आहे. तर एका फोटोमध्ये समांथा आणि राज निदिमोरू रस्त्यावर चालताना दिसत आहेत. यावेळी राज निदिमोरूनं समांथाच्या खांद्यावर हात टाकलेला आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोंवर चाहत्यांनी तिला कमेंट करत "राजसोबतचं नातं अधिकृत केलं का?" असं विचारलं आहे.

समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड राजबद्दल बोलायचं झालं तर त्याचं याआधी लग्न झालं होतं. पण, श्यामली डे हे त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे. आता तिच्यापासून विभक्त झालेला आहे. राजला त्याच्या पूर्व पत्नीपासून कोणतेही अपत्य नाही. दरम्यान, समांथा लवकरच राज आणि डीकेच्या आगामी 'रक्त ब्रह्मांड' या सीरिजमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीसेलिब्रिटी