Join us
Daily Top 2Weekly Top 5

EX पतीनं थाटला संसार, आता समांथा प्रभूला हवाय 'असा' जोडीदार, स्वतः शेअर केली पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 16:05 IST

नुकतंच समांथाचा EX पती नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्न करत नवा संसार थाटला आहे.

Samantha Ruth Prabhu o Life Partner : अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिच्या जीवनात अनेक चढउतार आलेत, पण ती सर्व संकटांवर मात करत पुढे गेली. अभिनेता नागा चैतन्यपासून घटस्फोट, नंतर 'मायोसिटिस; आजार या सर्व संकटांवर तिनं मोठ्या हिंमतीन मात केली आहे. नुकतंच समांथाचा EX पती नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत लग्न करत नवा संसार थाटला आहे. मात्र, समांथा सध्या एकटीच आहे. यातच तिची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

समांथानं पूर्व पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर एका प्रामाणिक जोडीदाराची इच्छा व्यक्त केली आहे. इन्स्टाग्रामवर समांथानं २०२५ च्या राशीभविष्यासंबंधीत एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टनुसार,  वृषभ, कन्या आणि मकर राशी असलेल्या व्यक्तींचं २०२५ हे वर्ष अत्यंत व्यस्त असेल, आयुष्यात आणि करिअरमध्ये वाढ होईल, आर्थिक स्थिरता आणि एकनिष्ठ आणि प्रेमळ जोडीदार मिळेल,  मोठी उद्दिष्टे पूर्ण होतील, मानसिक आणि शारीरिक आरोग्य मिळेल आणि आई व्हायचं असेल तर पुढील वर्ष त्यासाठी योग्य राहिलं. ही पोस्ट करत समांथाने त्यावर "आमेन" असं लिहून प्रार्थना केली आहे. 

समांथाचं वैयक्तिक आयुष्य सध्या कठीण काळातून जात आहे. मात्र, तिनं व्यावसायिक आयुष्यात चांगलं यश मिळवलं. नुकतंच तिची 'सिटाडेल: हनी बनी' ही नवी वेब सीरिज आली आहे. यात तिने गुप्तहेर असलेल्या आईची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेचं कौतुक होत आहे. शिवाय, येत्या काळात समांथा 'तुंबाड' फेम दिग्दर्शक राही बर्वेच्या 'रक्त ब्रह्मांड: द ब्लडी किंगडम' यात दिसणार आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनीलग्न