Join us  

'पक पक पकाक'मधील साळू आता दिसते अशी, अभिनेत्रीनं फॉरेनरसोबत केलं होतं गुपचूप लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 5:15 PM

'पक पक पकाक'मधील साळू हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

२००५ साली पक पक पकाक (Pak Pak Pakak) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात भुत्याची भूमिका नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केली होती तर चित्रपटात साळूचे पात्र निभावले होते अभिनेत्री नारायणी शास्त्री (Narayani Shastri) हिने. नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. नारायणी आज १६ एप्रिल रोजी तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करते आहे. नारायणीने टेलिव्हिजनवर मुख्य अभिनेत्रीपासून आई आणि सासूच्या भूमिका केल्या आहेत.

नारायणीच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर तिने २००० साली तिच्या सिनेकरिअरला सुरुवात केली. 'कहानी सात फेरे की'मध्ये नारायणी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली. यानंतर, ती एकामागून एक अनेक मालिकांचा भाग बनली आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये तिच्या दमदार अभिनयाची छाप पाडण्यात यशस्वी झाली. 'घाट', 'मुंबई मेरी जान' आणि 'चांदनी बार' यांसारख्या चित्रपटांमध्येही ती दिसली आहे. हिंदी मालिकेत काम करत असली तरी मराठी ही भाषाही तिला चांगलीच अवगत होती. पक पक पकाक नंतर ऋण या आणखी एका मराठी चित्रपटात तिने प्रमुख भूमिका केली.

नारायणी तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळते. एकीकडे इतर सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि नातेसंबंधांबद्दल चर्चेत असताना, नारायणीने नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्यास प्राधान्य दिले आहे. नारायणीचे लग्न झाल्याची बातमीही त्यांच्या लग्नाच्या दीड वर्षानंतर चाहत्यांना कळली होती.

२०१५ साली तिने परदेशी बॉयफ्रेंड असलेल्या ‘स्टीवन ग्रेवर’ सोबत गुपचूप लग्न केले होते. पण, अचानक एके दिवशी चाहत्यांना याची माहिती दिली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ब्रिटीश पती स्टीव्हन ग्रेव्हरसोबत नारायणी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत 

टॅग्स :नारायणी शास्त्रीनाना पाटेकर