Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमानच्या वर्कआऊटचा व्हिडीओ अपलोड

By admin | Updated: March 6, 2016 01:28 IST

बॉलीवूडचा सुपरस्टार सल्लूमियाँ जेव्हा एखादा चित्रपट करायला घेतो तेव्हा तो त्या चित्रपटात स्वत:चे मन, बुद्धी आणि शरीर संपूर्णपणे झोकून देतो.

बॉलीवूडचा सुपरस्टार सल्लूमियाँ जेव्हा एखादा चित्रपट करायला घेतो तेव्हा तो त्या चित्रपटात स्वत:चे मन, बुद्धी आणि शरीर संपूर्णपणे झोकून देतो. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘सुल्तान’ साठी खुप चर्चेत आहे. तो अत्यंत कष्टदायी अशा वर्कआऊट सेशन्समध्ये बिझी आहे. चित्रपटात तो पहेलवानाची भूमिका साकारतोय. वर्कआऊट सेशन्सचे त्याचे अनेक फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी नुकताच सलमानच्या वर्कआऊटचा एक व्हीडिओ अपलोड केला आहे. यात त्याचे पाय पुश-अप्स करताना पाहिले की लक्षात येईल की तो त्याच्या शरीराला किती मेहनत करायला लावतो आहे ते! अनुष्का शर्मानेही वर्कआऊटची एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. आता असे वाटतेय की, चित्रपटाची संपूर्ण टीमच त्याच्या भूमिकांना अत्यंत जबाबदारीने साकारत आहे. त्याचा चित्रपट जोपर्यंत रिलीज होत नाही तोपर्यंत म्हणे सलमान दिवसाला जवळपास चार तास जास्त वर्कआऊट करत आहे. तसेच तो हॉर्स रायडिंगचे धडे देखील घेत आहे.