Join us

माझ्या ह्दयात सलमानचे विशेष स्थान - सनी

By admin | Updated: December 22, 2015 14:53 IST

आपल्या बोल्ड, बिनधास्त, मादक अदांनी घायाळ करणा-या सनी लिऑनसाठी अनेक तरुणांचे हदय धडकते.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २२ - आपल्या बोल्ड, बिनधास्त, मादक अदांनी घायाळ करणा-या सनी लिऑनसाठी अनेक तरुणांचे हदय धडकते. सनीच्या ह्दयात आपल्याला स्थान मिळावे अशी अनेक तरुणांची इच्छा आहे. पण सनीच्या ह्दयात बॉलिवुडचा 'दबंग' सलमानसाठी विशेष स्थान आहे.  

मी सलमानची खूप मोठी चाहती आहे. मी इथे आली त्यावेळी इंडस्ट्रीतला तो पहिला माणूस होता ज्याने मला शुभेच्छा देऊन स्वागत केले. जेव्हा तुम्ही नवीन असता त्यावेळी पहिल्यांदा तुम्हाला जे आधार, प्रेरणा देतात ते तुमच्यासाठी नेहमीच खास असतात असे सनीने सलमानची स्तुती करताना सांगितले. 
बॉलिवुडमध्ये प्रवेश करण्याआधी सनीने सलमानच्या हिट रिअॅलिटी शो 'बिग बॉस'मधून सुरुवात केली होती. ३४ वर्षांची सनी सध्या सलमानच्या संपर्कात नाही तरीही ती सलमानचे गुणगान गाते. सलमानने नेहमीच सर्वांना मदत केली आहे. त्याने मला भेटण्यासाठी बोलावले होते त्यावेळी मी देशाबाहेर होते. लवकरच त्याच्या बरोबर भेट होईल अशी आशा आहे असे सनीने सांगितले. 
सलमान बॉलिवुडमध्ये ज्या अभिनेत्रींना हात देतो, त्या अभिनेत्री शिखरावर पोहोचतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हिंदीवर प्रभुत्व नसलेली कतरीना कैफ त्याचे उदहारण आहे. आता सनीलाही सलमानच्या त्याच हाताची प्रतिक्षा असावी, म्हणून कदाचित ती संपर्कात नसलेल्या सलमानची इतकी स्तुती करत असावी.