अभिनेता सलमान खान (salman khan) त्याच्या आगामी 'सिकंदर' (sikandar movie) सिनेमामुळे चर्चेत आहे. पुढील तीन दिवसांमध्ये 'सिकंदर' सिनेमा जगभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. 'सिकंदर' सिनेमाच्या निमित्ताने सध्या सलमान विविध माध्यमांना मुलाखती देत आहे. यावेळी सलमान भविष्यात राजकारणात एन्ट्री करणार का, असा प्रश्न त्याला विचारला असता सलमानने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.
सलमान राजकारणात एन्ट्री घेणार
'सिकंदर' सिनेमात एक संवाद आहे की, "सीएम-पीएम का तो पता नहीं, मगर एमएलए, एमपी तो बन जाऊंगा." त्यामुळे भविष्यात सलमान राजकारणात एन्ट्री घेणार का, असा प्रश्न त्याला विचारला असता भाईजान म्हणाला, "यानंतर मुझे कोई इंटरेस्ट नही असाही एक डायलॉग आहे. राजकारण हे माझं फिल्ड नाही. जर कोणाला सरकार आणि प्रशासनाचा कार्यभार याविषयी माहिती नसेल तर त्याला त्या क्षेत्रात सहभागी होता कामा नये. ते मला येत नाही त्यामुळे राजकारण हे माझं काम नाही. मला अभिनय चांगा चांगला जमतो त्यामुळे मी हेच करत राहील."
अशाप्रकारे सलमानने राजकारणात एन्ट्री घेणार का? या प्रश्नावर मौन सोडलंय. दरम्यान सलमानचा 'सिकंदर' सिनेमा ३० मार्चला रिलीज होतोय. या सिनेमात सलमान खानसोबतरश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, शर्मन जोशी हे कलाकार झळकणार आहेत. अनेक वर्षांनी सलमान खान प्रमुख भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीला येत आहे.त्यामुळे 'सिकंदर'ची उत्सुकता शिगेला आहे.