Join us  

करण जोहरचा सिनेमा The Bull मधून सलमान खान पडला बाहेर?, कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 9:55 AM

Salman Khan And Karan Johar : सलमान खानचा 'द बुल' चित्रपट मागील वर्ष २०२३ पासून चर्चेत आहे. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार होता. दोघेही जवळपास २५ वर्षांनंतर एका चित्रपटात एकत्र काम करणार होते, पण आता बातम्या येत आहेत की सलमानने या प्रोजेक्टमधून स्वतःला बाहेर काढले आहे.

सलमान खान(Salman Khan)चा 'द बुल' (The Bull) चित्रपट मागील वर्ष २०२३ पासून चर्चेत आहे. करण जोहर (Karan Johar) या चित्रपटाची निर्मिती करणार होता. दोघेही जवळपास २५ वर्षांनंतर एका चित्रपटात एकत्र काम करणार होते, पण आता बातम्या येत आहेत की सलमानने या प्रोजेक्टमधून स्वतःला बाहेर काढले आहे.

असे म्हटले जात आहे की 'द बुल' चित्रपटाचे काम यापूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये सुरू होणार होती, परंतु ते पुढे ढकलण्यात आले. आता ते मेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. अशा स्थितीत सलमानने या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला आहे. 

नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगला करणार सुरुवातवास्तविक, बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, सलमान खान आणि करण जोहर यांच्यात बराच वेळ संभाषण झाले होते. रिपोर्ट्सनुसार, करण जोहरने सलमानला जुलैपर्यंत मुदतवाढ मागितली, त्यानंतर सलमानने साजिद नाडियादवाला आणि एआर मुरुगादास यांच्यासोबतच्या त्याच्या प्रोजेक्ट्सला प्राधान्य दिले. त्याचा प्रोजेक्ट मे महिन्यात सुरू होणार आहे. असे सांगण्यात आले की 'बुल'चे दिग्दर्शक विष्णुवर्धन आणि निर्माता करण शूटिंगची तारीख ठरवू शकले नाहीत आणि त्यामुळेच दबंग खान बाहेर पडला आणि करणलाही आपल्या निर्णयाबद्दल सांगितले. आता या चित्रपटात निर्माते कोणाला कास्ट करतात हे पाहावे लागेल.

साजिद नाडियादवालाचा सिनेमा कधी होणार प्रदर्शित?एआर मुरुगादास दिग्दर्शित साजिद नाडियादवाला निर्मित सलमान खानच्या पुढच्या चित्रपटाबाबतही बरीच चर्चा आहे. पुढील वर्षी २०२५ मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपटाचे शीर्षक किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती अद्याप शेअर केलेली नाही.

टॅग्स :सलमान खानकरण जोहर