Join us

सलमान खानने पूर्ण केली ‘जुडवा-२’ची शूटिंग!

By admin | Updated: July 14, 2017 02:53 IST

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या सुपरहिट ‘जुडवा’ या चित्रपटाचा सिक्वल येत असून, यामध्ये सलमान कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे.

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याच्या सुपरहिट ‘जुडवा’ या चित्रपटाचा सिक्वल येत असून, यामध्ये सलमान कॅमिओ करताना बघावयास मिळणार आहे. ‘जुडवा-२’ मध्ये सलमानची जागा वरुण धवन घेणार आहे, तर जॅकलीन फर्नांडिस आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दरम्यान, सलमानने चित्रपटातील त्याची भूमिका पूर्ण केली असून, याबाबतचा एक फोटो वरुण धवनने शेअर केला आहे. फोटोमध्ये ‘जुडवा-२’ची संपूर्ण टीम बघावयास मिळत आहे.या चित्रपटात सलमान कॅमिओ करणार असल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात होते. परंतु, याविषयी कोणीही निश्चितपणे सांगू शकत नव्हते. अखेर वरुणने टीमसोबत फोटो शेअर करून ‘कॅमिओ’च्या वृत्ताला एकप्रकारचा दुजोराच दिला आहे. दरम्यान, या फोटोवरून एक गोेष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे सलमानने त्याची शूटिंग पूर्ण केली आहे.