बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटात बॉक्सिंग करताना दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते सूरज बडजात्या यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटात सलमान डबल रोलमध्ये दिसणार आहे. सूरजच्या इतर चित्रपटांप्रमाणो याही चित्रपटात सलमान एका शांत आणि लाजाळू तरुणाच्या भूमिकेत दिसेल, तर त्याची दुसरी भूमिका ही बॉक्सरची असणार आहे. तब्बल 8 वर्षानी दिग्दर्शन क्षेत्रत पुनरागमन करणा:या बडजात्या यांच्या चित्रपटात सलमान खानसह सोनम कपूर, अनुपम खेर, नील नितीन मुकेश, अरमान कोहली आणि स्वरा भास्कर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी
रिलीज होईल.