‘किक’मध्ये सलमानसोबत मुख्य भूमिकेत दिसलेली जॅकलीन फर्नांडिस सलमान खानच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाली आहे. नुकताच जॅकलीनने तिचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ती म्हणाली की, ‘सलमान पे्ररणादायी सह कलाकार असून आता माझा आदर्श बनला आहे.’ सध्या जॅकलीन बँगिस्तान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ती म्हणते की, ‘पहिला चित्रपट साईन केला, तेव्हापासून सलमानला ओळखते; पण त्यावेळी आम्ही फक्त ओळखत होतो. रेस-२ च्या प्रमोशनदरम्यान त्याच्या बिग बॉस शोमुळे त्याला भेटायची संधी मिळाली. किकच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी त्याच्यासोबत काम करणार म्हणून खूप नर्व्हस होते; पण पुढे मला समजले की, ती एक चांगली व्यक्ती आहे. ’
सलमानला आदर्श मानते : जॅकलीन
By admin | Updated: August 13, 2014 08:46 IST