Join us  

अन् सेकंदात तुटली सलीम खान-जावेद अख्तर यांची जोडी! काय झाले होते नेमके?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 1:29 PM

फार कमी लोकांना ठाऊक असेल की, सलीम खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. सलीम खान यांनी एक अभिनेता म्हणूनच त्यांच्या कारकिदीर्ची सुरुवात केली होती.

सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचा आज वाढदिवस. सलीम-जावेद या जोडीने भारतीय सिनेमाला दिवार, जंजीर, शोले, शान, शक्ती यासारखे क्लासिक सिनेमे दिलेत. या सिनेमांचे संवाद आणि त्याच्या कथेचे कौतुक आजही होते. फार कमी लोकांना ठाऊक असेल की, सलीम खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. सलीम खान यांनी एक अभिनेता म्हणूनच त्यांच्या कारकिदीर्ची सुरुवात केली होती. त्यांनी ‘भारत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी दिवाना, तिसरी मंजिल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण एक अभिनेता म्हणून त्यांना त्यांची ओळख मिळवता आली नाही. सलीम खान हे मुळचे इंदौरचे असून ते केवळ कामासाठी मुंबईत आले होते. चित्रपटात अपयश मिळाल्यानंतर पुन्हा इंदौरला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी चित्रपटांचे लेखन करायला सुरुवात केली.

शोले, जंजीर, डॉन, दीवार, नाम, काला पत्थर अशा अनेक चित्रपटांचे लेखन या जोडीने केले होते. सिनेमांचे नाव सांगावे तितके कमी आहे. एकूण २३ सिनेमे त्यांनी एकत्रित लिहिले. त्यानंतर असे काय झाले की त्यांचे मार्ग वेगळे झाले. एक दिवस जावेद अख्तर सलीम यांच्याकडे आले आणि त्यांनी सरळ सांगितले आता आपण वेगळे होऊया. हे ऐकून सलीम यांना धक्काच बसला. त्यांना कळलेच नाही की जावेद असे का बोलत आहे.

एक दिवस जावेद अख्तर सलीम यांच्याकडे आले आणि त्यांनी सरळ सांगितले आता आपण वेगळे होऊया. हे ऐकून सलीम यांना धक्काच बसला. त्यांना कळलेच नाही की जावेद असे का बोलत आहे.

यावर सलीम यांनी फक्त इतकेच विचारले, हा विचार पाच मिनिटापुर्वी तर डोक्यात नसेल आला. यावर जावेद म्हाणाले, ते बऱ्याच काळापासून हा विचार करत आहेत. हे ऐकून सलीम त्यांच्या गाडीकडे निघाले. जावेद यांनी अडवल्यावर ते म्हणाले मी स्वत:ची काळजी घेऊ शकतो. सलीम म्हणाले प्रत्येक नात्याचा शेवट असतो.'

अनेक वर्षांनंतर जावेद यांनी सांगितलेा, ११ वर्ष आम्ही सोबत काम केले. एक रॅपो, विश्वास आमच्यात तयार झाला होता. अनेकदा न सांगताच आम्हाला एकमेकांच्या गोष्टी कळायच्या. मात्र हळूहळू हा रॅपो कमी होत गेला आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :सलीम खान