Join us  

ही तालीम अविस्मरणीय! राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचले सलील कुलकर्णी, शेअर केले Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:24 AM

'आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, चित्रपटाच्या रिहर्सल्स(तालमी) केल्या...पण...' सलील कुलकर्णींची पोस्ट

भारताची राजधानी दिल्लीमध्ये आज १७ ऑक्टोबर रोजी ६९ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचे मानकरी दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पोहोचले आहेत. भारतीय सिनेमाशी निगडित अनेक सर्वच विजेते सोहळ्याच्या ठिकाणी आले आहेत. बॉलिवूडमधून आलिया भट पती रणबीर कपूरसह पोहचली आहे. तर साऊथमधून अल्लू अर्जुन पत्नीसह आला आहे. दरम्यान संगीतकार सलील कुलकर्णी यांनाही 'एकदा काय झालं' सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे. सलील कुलकर्णींनी सोहळ्याच्या आदल्या दिवशीची एक झलक सोशल मीडियावरुन दाखवली आहे.

सलील कुलकर्णी यांनी काही सेल्फी शेअर केले आहेत. तसंच त्यांनी ६९ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्काराचं निमंत्रण पत्रकही दाखवलं आहे. ते लिहितात, 'आजपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या, चित्रपटाच्या रिहर्सल्स(तालमी) केल्या...पण ही तालीम अविस्मरणीय आहे..'

आज दुपारी ३ वाजता राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. याची रंगीत तालीम काल राष्ट्रपती भवनात पार पडली. त्याचेच फोटो सलील कुलकर्णींनी इथे शेअर केलेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसतोय. सलील कुलकर्णी हे उत्तम गायक, संगीतकार तर आहेच मात्र 'एकदा काय झालं' या सिनेमाचं त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. याच सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. सिनेमात सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, सुहास जोशी, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री यांनी भूमिका साकारली होती. बाप आणि लेकाच्या नात्यावर सिनेमा आधारित होता. याआधी सलील कुलकर्णींनी 'वेडिंगचा शिनेमा' चं दिग्दर्शन केलं होतं.

टॅग्स :सलील कुलकर्णीमराठी चित्रपटमराठी गाणीएकदा काय झालंराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार